Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 19:11 IST2025-10-18T19:10:30+5:302025-10-18T19:11:17+5:30
Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात आठवडाभर चाललेल्या घडामोडींनंतर आता आठवड्याच्या अखेरीस सलमान खान घरातील प्रत्येक सदस्याने केलेल्या कृतीचा हिशोब घेताना दिसणार आहे. या आठवड्यात क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती ही सलमान खानच्या निशाण्यावर राहणार आहे.

Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय?
बिग बॉसच्या घरात आठवडाभर चाललेल्या घडामोडींनंतर आता आठवड्याच्या अखेरीस सलमान खान घरातील प्रत्येक सदस्याने केलेल्या कृतीचा हिशोब घेताना दिसणार आहे. या आठवड्यात क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती ही सलमान खानच्या निशाण्यावर राहणार आहे. तसेच अमाल मलिक आणि शाहबाज यांनाही त्यांच्या गेरवर्तनामुळे सलमान खान फटकार लगावण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणारा बिग बॉसचा हा एपिसोड खुपच रंगतदार होण्याची शक्यता आहे.
या शोचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये सलमान खान आक्षेपार्ह भाषेत बोलल्याबद्दल मालती चहर हिला खडसावताना दिसत आहे. बिग बॉसच्या हल्लीच झालेल्या भागात नेहलसोबत झालेल्या भांडणानंतर मालती हिने नेहलच्या कपड्यांबाबत टिप्पणी केली होती. पुढच्या वेळी माझ्याशी कपडे घालून बोल, असे मालती हिने नेहलला सुनावले होते.
आता आठवड्यातील शेवटच्या दिवशी सलमान खानने या कमेंटवरून तिला फटकारले आहे. तुझ्या बोलण्याचा अर्थ काय होता, असं सलमान खानने मालती हिला विचारलं. त्यावर मालती म्हणाली की, ‘इथे खूप स्ट्राँग एसी आहे. तरीही या लोकांना थंडी कशी वाजत नाही, असा प्रश्न मला पडलाय’. मालतीच्या या उत्तरानंतर ‘काय वायफळ बोलतेय ही’, असं म्हणत बशीर संतापला. मात्र ती काय बोलतेय हे मला ऐकायचे आहे. त्यामुळे तिला बोलू द्या, असे सलमान खानने सांगितले.