Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 10:55 IST2025-08-10T10:54:48+5:302025-08-10T10:55:21+5:30
Bigg Boss 19 : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे. 'बिग बॉस १९'मध्ये हिमांशी नरवाल एन्ट्री घेणार असल्याचं बोललं जात आहे.

Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
Bigg Boss 19 : 'बिग बॉस' या गाजलेल्या आणि लोकप्रिय रिएलिटी शोचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बिग बॉस १९'बद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक दिसणार याबाबत चर्चा रंगली आहे. रोज नव्या स्पर्धकांची नावं समोर येत आहेत. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे. 'बिग बॉस १९'मध्ये हिमांशी नरवाल एन्ट्री घेणार असल्याचं बोललं जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हिमांशी नरवाल यांना 'बिग बॉस १९'ची ऑफर मिळाली आहे. टेली चक्करने दिलेल्या माहितीनुसार, हिमांशी नरवाल यांना 'बिग बॉस १९'च्या टीमकडून संपर्क साधण्यात आला आहे. "टीमला अशा लोकांना शोमध्ये घ्यायचं आहे जे स्पर्धकांना आपलेसे वाटतील. 'बिग बॉस १९'मध्ये हिमांशी नरवाल यांना घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. पण, अद्याप हे कन्फर्म नाही", अशी माहिती देण्यात आली आहे. आता खरंच हिमांशी नरवाल 'बिग बॉस १९'मध्ये दिसणार का? हे पाहावं लागेल.
एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात आर्मीचे जवान विनय नरवाल शहीद झाले होते. ते लग्नानंतर त्यांची पत्नी हिमांशीसोबत जम्मू-काश्मीरमध्ये हनिमूनसाठी गेले होते. दहशतवादी हल्ल्यानंतर एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. नवविवाहित वधू पतीच्या मृतदेहाजवळ बसल्याच्या या फोटोने हळहळ व्यक्त केली जात होती.