बिग बींनी चौथ्यांदा जिंकला नॅशनल अ‍ॅवॉर्ड

By Admin | Updated: March 30, 2016 01:09 IST2016-03-30T01:09:51+5:302016-03-30T01:09:51+5:30

महानायक अमिताभ बच्चनने ‘पीकू’साठी या वर्षीचा बेस्ट अ‍ॅक्टरचा अ‍ॅवॉर्ड जिंकला आहे. त्यांचा हा चौथा नॅशनल अ‍ॅवॉर्ड आहे. ‘पीकू’मध्ये अमिताभ बच्चनने एक अशा खडूस बंगाली

Big B won the fourth National National Award | बिग बींनी चौथ्यांदा जिंकला नॅशनल अ‍ॅवॉर्ड

बिग बींनी चौथ्यांदा जिंकला नॅशनल अ‍ॅवॉर्ड

महानायक अमिताभ बच्चनने ‘पीकू’साठी या वर्षीचा बेस्ट अ‍ॅक्टरचा अ‍ॅवॉर्ड जिंकला आहे. त्यांचा हा चौथा नॅशनल अ‍ॅवॉर्ड आहे. ‘पीकू’मध्ये अमिताभ बच्चनने एक अशा खडूस बंगाली वयोवृद्धाची भूमिका केली जो आपल्या मुलीवर (पीकू) अवलंबून असतो आणि नेहमी तिच्यासोबत वाद घालीत असतो. ही भूमिका अमिताभ यांनी खरंच फार सुंदर वठवली आहे. ७० च्या दशकापासून चित्रपटात काम करणाऱ्या अमिताभ यांना १९९१ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार ‘अग्निपथ’ या चित्रपटासाठी मिळाला. त्या वेळी केंद्रात चंद्रशेखर यांचे सरकार सत्तेवर होते. काँग्रेस सरकार, गांधी परिवार आणि बच्चन कुटुंबातील कटुतेमुळे चंद्रशेखर सरकारने अमिताभ यांना हा पुरस्कार दिल्याची चर्चाही त्या वेळी झाली. अमिताभ बच्चन यांना दुसरा राष्ट्रीय पुरस्कार संजय लीला भन्सालींच्या ‘ब्लॅक’ चित्रपटासाठी २००७ मध्ये मिळाला. मात्र त्या वेळी केंद्रात यूपीए सरकार होते. बिग बींना तिसरा अ‍ॅवॉर्ड बाल्कीचा चित्रपट ‘पा’मध्ये आरोच्या भूमिकेसाठी २०१० मध्ये मिळाला आणि आता ‘पीकू’साठी त्यांना चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे.
- anuj.alankar@lokmat.com

Web Title: Big B won the fourth National National Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.