बिग बी, आमिर खान करणार दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन
By Admin | Updated: June 10, 2014 09:15 IST2014-06-09T15:28:06+5:302014-06-10T09:15:07+5:30
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या 'सबस्टन्स अँड शॅडो' या आत्मचरित्राचे अमिताभ बच्चन व आमिर खान यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

बिग बी, आमिर खान करणार दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ९ - चित्रपटाच्या क्षेत्रात 'ट्रॅजिडी किंग' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर.. दिलीपकुमार यांचे आत्मचरित्र येत असून बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आणि मि.पर्फेक्शनिस्ट आमिर खान या दोघांच्या हस्ते त्याचे आज प्रकाशन होणार आहे. 'सबस्टन्स अँड शॅडो' असे या आत्मचरित्राचे नाव असून मुंबईत होणा-या या प्रकाशन समारंभाला गानसम्राज्ञी लता मंगेशकरही उपस्थित राहणार आहेत.
आपल्या दमदार अभिनायने गेल्या अनेक दशकांपासून चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या दिलीप कुमार यांच्या वैयक्तिक आयुष्यबद्दल रसिकांना फारशी माहिती नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडून आपल्या जीवनाचा आढावा घेणारे पुस्तक म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच असेल. या पुस्तकात दिलीप कुमार यांचा जन्म, त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवेश, तेथील इतक्या वर्षांचा प्रवास ते आत्तापर्यंतच्या जीवनाची माहिती आहे.
दिग्दर्शक करण जोहर या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार असून अमिताभ बच्चन दिलीप कुमार या पुस्तकातील काही भाग वाचणार आहेत. तर प्रसून जोशी यांनी दिलीप कुमार यांच्यावर लिहीलेल्या कवितेचे मि. पर्फेक्शनिस्ट आमिर खान वाचन करणार आहे.