भरत जाधव, केदार शिंदे पुन्हा एकत्र
By Admin | Updated: November 26, 2014 00:34 IST2014-11-26T00:34:30+5:302014-11-26T00:34:30+5:30
भरत जाधव आणि केदार शिंदे यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांची जोडी पुन्हा एकदा पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या रसिकांची ही इच्छा लवकरच पूणर होणार आहे.

भरत जाधव, केदार शिंदे पुन्हा एकत्र
भरत जाधव आणि केदार शिंदे यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांची जोडी पुन्हा एकदा पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या रसिकांची ही इच्छा लवकरच पूणर होणार आहे. ढॅण्टॅ ढॅण हे त्यांचे नवीन नाटक लवकरच रंगमंचावर येत आहे. केदार शिंदे यांनी काही लिहिलं आणि चाहत्यांनी डोक्यावर घेतलं नाही, असं कधी होत नाही. सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, लोच्या झाला रे, पुन्हा सही रे सही अशा नाटकांना प्रेक्षकांनी उचलून धरलं. आता ‘ढॅण्टॅ ढॅण’च्या रुपात नाटय़रसिकांसाठी ते काय घेऊन येतात याची सर्वानाच उत्सुकता आहे. या नाटकाचे लेखनसुद्धा केदार शिंदे यांनीच केले आहे. भरत जाधव यांनी सप}िक पूजा करुन अलीकडेच या नाटकाचा मुहूर्त केला आणि आता नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली आहे. या नाटकाविषयी अद्याप तरी फारसे काही बाहेर आले नाही, मात्र ही जोडगोळी काही तरी अफलातून करेल यात शंका नाही.