सलमानला बेस्ट कोरिओग्राफरचे नामांकन दिल्यामुळे भडकली वैभवी मर्चंट

By Admin | Updated: January 24, 2017 10:10 IST2017-01-24T10:05:34+5:302017-01-24T10:10:12+5:30

फिल्मफेअर पुरस्कारांच्या यादीवरून बराच वाद सुरू असून सुलतान चित्रपटातील गाण्यासाठी सलमानला नामांकन देिल्याबद्दल वैभवी मर्चंटने नाराजी दर्शवली आहे.

Bhadkali Vaibhavi Merchant, Salman Khan's nomination for Best Choreographer | सलमानला बेस्ट कोरिओग्राफरचे नामांकन दिल्यामुळे भडकली वैभवी मर्चंट

सलमानला बेस्ट कोरिओग्राफरचे नामांकन दिल्यामुळे भडकली वैभवी मर्चंट

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - पंजाबी चित्रपटात यशस्वी भूमिका निभावल्यानंतर ' उडता पंजाब' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या अभिनेता दिलजित दोसांजला फिल्मफेअरतर्फे 'सर्वोत्कृष्ट पदार्पण' पुरस्कार देण्यात आला. मात्र ' मिर्झिया' चित्रपटातून सिनेसृष्टीत दाखल झालेला हर्षवर्धन कपूर याला ही बाब चांगलीच झोंबली आणि त्याने या मुद्यावरून आगपाखडही केली. तसेच 'सरबजीत' चित्रपटासाठी रणदीप हुडाने प्रचंड मेहनत घेऊन भूमिका साकारल्यानंतरही फक्त ऐश्वर्या राय-बच्चनला नामांकन देण्यात आल्यानंतर गायक अमाल मलिकनेही नाराजी दर्शवली होती. या सर्व मुद्यांमुळेफिल्मफेअर अॅवॉर्डस चर्चेत असतानाच आता सुप्रसिद्ध कोरिओग्राफर वैभवी मर्चंटही पुरस्कारांच्या नामांकनाबद्दल फारशी खुश दिसत नाही. . 
झालं असं की, यंदाच्या पुरस्कारात 'सुलतान ' चित्रपटातील ' जग घूमेया' गाण्यासाठी अभिनेता सलमान खानला सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर म्हणून नामांकन देण्यात आले होते. हे रोमँटिक गाणं राहत फते अली खान यांनी गायले असून त्यातील सलमानची सिग्नेचर स्टेपही खूप फेमस झाली होती. त्यामुळे त्याला हे नामांकन देण्यात आले होते. मात्र ही बाब वैभवीला फारशी रुचली नाही. तिने ट्विटरवरून प्रश्न विचारत आपली नाराजी दर्शवली. 

Web Title: Bhadkali Vaibhavi Merchant, Salman Khan's nomination for Best Choreographer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.