शूटिंगवर परतली श्रद्धा
By Admin | Updated: November 7, 2014 02:17 IST2014-11-07T02:17:28+5:302014-11-07T02:17:28+5:30
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर काही दिवसांपूर्वी एबीसीडी २ च्या रिहर्सलदरम्यान जखमी झाली होती.

शूटिंगवर परतली श्रद्धा
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर काही दिवसांपूर्वी एबीसीडी २ च्या रिहर्सलदरम्यान जखमी झाली होती. काही दिवसांच्या आरामानंतर श्रद्धा पुन्हा चित्रपटाच्या शूटिंगवर परतली आहे. एबीसीडी २ हा चित्रपट एबीसीडी एनीबडी कॅन डान्सचा सिक्वल आहे. श्रद्धाने तिचा उत्साह टिष्ट्वटरवर व्यक्त केला आहे. तिने लिहिले की, ‘एबीसीडी २ च्या शूटिंगवर काल परतले. असे वाटतेय की मी यापूर्वी कधीही एवढी एक्सायटेड नव्हते.’ आता ती शूटिंगवर परतली आहे तर ती सावधगिरी बाळगेल, अशी तिच्या फॅन्सना अपेक्षा आहे. रेमो डिसुजाचे दिग्दर्शन असलेल्या या सिक्वलमध्ये वरुण धवन आणि प्रभू देवाही मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २६ जून २०१५ ला रिलीज होत आहे.