सोनू निगमवर झी मीडियाची बंदी

By Admin | Updated: April 29, 2015 16:12 IST2015-04-29T16:12:51+5:302015-04-29T16:12:51+5:30

गायक सोनू निगमवर झी मीडियाने बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी गजेंद्र सिंग नावाच्या शेतक-याने आपच्या सभेदरम्यान आत्महत्या केली होती

Ban on Zee Media on Sonu Nigam | सोनू निगमवर झी मीडियाची बंदी

सोनू निगमवर झी मीडियाची बंदी

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - गायक सोनू निगमवर झी मीडियाने बंदी घातली आहे. 
काही दिवसांपूर्वी गजेंद्र सिंग नावाच्या शेतक-याने आपच्या सभेदरम्यान आत्महत्या केली होती. त्यावर कुमार विश्वास यांनी लटगया अशी प्रतिक्रिया दिल्याचे झी मीडियाने दाखवले होते. या व्हिडिओवर ट्विटमध्ये, माझा राजकरणाशी संबंध नाही पण, माझा कवी मित्र कुमार विश्वास याच्या विषयी दाखवण्यात येणा-या व्हिडिओचे सत्य बाहेर यावे इतकीच माझी इच्छा आहे, असे सोनू निगम यांनी म्हटले आहे.  या प्रकऱणी सोनू निगम यांच्या गाण्यांशी संबंधित कोणतेही संगिताचे हक्क विकत न घेण्याचा निर्णय झी मीडियाने घेतला आहे. हे प्रकरण सोशल मीडियामार्फत सोनू निगमच्या चाहत्यांपर्यंत जाताच त्यांनी सोनू निगमच्या ट्विटवर रिट्विट करत त्यांना पाठिंबा दिला आहे. सोनू निगम यांचे निवेदन असलेला गाण्याचा कार्यक्रम एकेकाळी झी टिव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अदिराज्य गाजवत होता. 

Web Title: Ban on Zee Media on Sonu Nigam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.