बजरंगी देशभरात ‘टॅक्स फ्री’ करण्याची मागणी
By Admin | Updated: July 20, 2015 02:22 IST2015-07-20T02:22:29+5:302015-07-20T02:22:29+5:30
सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ १७ जुलै रोजी देशभरात प्रदर्शित झाला. रमजान ईदच्या मुहूर्तावर सलमान चित्रपट प्रदर्शित करत असतो.

बजरंगी देशभरात ‘टॅक्स फ्री’ करण्याची मागणी
सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ १७ जुलै रोजी देशभरात प्रदर्शित झाला. रमजान ईदच्या मुहूर्तावर सलमान चित्रपट प्रदर्शित करत असतो. या चित्रपटातून माणुसकीचा संदेश देण्यात आला आहे. देशभरात ‘बजरंगी’ चित्रपट मनोरंजन करापासून मुक्त करण्याची मागणी केली जात आहे. चित्रपटातून देण्यात आलेल्या संदेशाचे कौतुक होत आहे. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला एकदा तरी ‘बजरंगी’ पाहा असे सांगत आहे. मल्टिप्लेक्समध्ये वाढलेले तिकिटांचे दर पाहता चित्रपटाला मनोरंजन करापासून मुक्त करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे जास्तीतजास्त जनता चित्रपट पाहू शकेल. याबाबतीत सलमानच्या पार्टनर कंपनी इरोजशी संपर्क केला असता ते म्हणाले, ‘कंपनीतर्फे तरी विचार सुरू आहे. वेगवेगळ्या राज्यांमधील शासनाशी संपर्क केला जात आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही वाटते आहे की, बजरंगीला टॅक्स फ्री केल्यास काही अडचण येणार नाही, कारण चित्रपट प्रत्येकाला माणुसकीचा संदेश देतो. पुढील आठवड्यापर्यंत टॅक्स फ्री होण्याची शक्यता वाटते आहे.
‘बजरंगी’ने ‘किक’चा रेकॉर्ड मोडला
सलमान खान बॉलीवूडमधील असा अभिनेता आहे, ज्याची स्पर्धा त्याच्या स्वत:च्याच चित्रपटांसोबत होत असते. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या बजरंगी भाईजानची ओपनिंग एवढी जबरदस्त आहे की, सलमानने स्वत:चा चित्रपट किकलाही पछाडले आहे. बजरंगीने पहिल्याच दिवशी २७ कोटींचा बिझनेस केला, तर ईदवेळीच रिलीज झालेल्या किकने २६ कोटींचे क लेक्शन केले. मागील वर्षी ज्या वेळी किक प्रदर्शित झाला त्या वेळी दुसऱ्या दिवशीही ईद होती आणि यंदाही तसेच झाले. शनिवारी म्हणजे ईदला पहिल्या दिवशीपेक्षा कमाई दुप्पट झाली. बजरंगीने पहिल्या दिवशीच्या हिशेबानुसार ‘पीके’ चित्रपटालाही मागे सोडले. ‘पीके’ची पहिल्या दिवशीची कमाई २५ कोटी होती.