‘बाजीराव-मस्तानी’मधून पेशवाईची शौर्यगाथा

By Admin | Updated: November 30, 2015 02:36 IST2015-11-30T02:36:41+5:302015-11-30T02:36:41+5:30

चि त्रपट ‘बाजीराव मस्तानी’ च्या गाण्याने प्रत्येक सिनेरसिकाच्या मनामध्ये एक विशेष स्थान निर्माण केले आहे. ‘पिंगा’, ‘गजानना’ आणि

'Bajirao-Mastani' Peshwa's bravery | ‘बाजीराव-मस्तानी’मधून पेशवाईची शौर्यगाथा

‘बाजीराव-मस्तानी’मधून पेशवाईची शौर्यगाथा

चि त्रपट ‘बाजीराव मस्तानी’ च्या गाण्याने प्रत्येक सिनेरसिकाच्या मनामध्ये एक विशेष स्थान निर्माण केले आहे. ‘पिंगा’, ‘गजानना’ आणि ‘दीवानी मस्तानी’ ही गाणी उत्तम आहेतच, पण दीवानी मस्तानी गाण्याकरिता बनवण्यात आलेला ‘आईना महल’ ही तेवढाच खास होता. आता प्रेक्षकांसमोर ‘मल्हारी’ हे विजयगीत येत असून, चित्रपटात या गाण्याचे विशेष महत्त्व आहे. मल्हारी या गाण्यात पेशवा बाजीराव यांचे शौर्य आणि विजयी जल्लोष दाखवण्यात आला आहे. अभिनेता रणवीर सिंहने कित्येक दिवसांच्या प्रॅक्टिसनंतर गाण्याचे चित्रण पाच दिवसांत पूर्ण केले. विशेष म्हणजे, रणवीर जखमी अवस्थेत असतानाही त्याने पाच दिवसांत हे गाणे पूर्ण केले. मल्हारी गीतास विशाल दादलानीने आवाज दिला असून, गणेश आचार्यने कोरियोग्राफ केले आहे. इरोस इंटरनॅशनल आणि संजय लीला भंसाली निर्मित अभिनेता रणवीर सिंह, प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोन, मिलिंद सोमन आणि तन्वी आझमी चित्रीत चित्रपट बाजीराव मस्तानी १८ दिसंबर २०१५ रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

Web Title: 'Bajirao-Mastani' Peshwa's bravery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.