अशोक झळकणार ‘या’ मालिकेत
By Admin | Updated: June 9, 2017 02:42 IST2017-06-09T02:42:40+5:302017-06-09T02:42:40+5:30
अशोक लोखंडे सध्या एका मालिकेत झळकत आहे.

अशोक झळकणार ‘या’ मालिकेत
अशोक लोखंडे सध्या एका मालिकेत झळकत आहे. या मालिकेनंतर आता ते मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला विविध छटा आहेत. एक वडील, एक मित्र, एक पती, एक आजोबा अशा त्यांच्या भूमिकेला विविध छटा असून सेवानिवृत्तीनंतर आपले आयुष्य अतिशय मजेशीर पद्धतीने जगणाऱ्या माणसाची ते व्यक्तिरेखा साकारत आहेत. या मालिकेत ते एका विनोदी भूमिकेत झळकणार आहेत. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी एका मालिकेत विनोदी भूमिका साकारली होती. पण गेल्या काही वर्षांत त्यांना विनोदी भूमिका साकारण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी ते खूपच उत्सुक आहेत. या मालिकेत अशोक लोखंडे यांचा मुलगा एक निर्माता असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याच्या प्रसिद्धीमुळे ते नेहमीच सगळ्यांसमोर बढाया मारत असतात. पण घरी हाच त्यांचा निर्माता मुलगा आई आणि बायको यांच्यात फसलेला दाखवण्यात आला आहे. आपल्या मुलाची तो नेहमी मजा लुटत असतो. ही भूमिका साकारायला अशोक लोखंडे यांना खूप मजा येत आहे.