अशोक समर्थ स्त्री वेशात!
By Admin | Updated: November 17, 2014 01:56 IST2014-11-17T01:56:42+5:302014-11-17T01:56:42+5:30
मनोरंजनातून प्रबोधनाच्या उद्देशातून संत एकनाथ महाराजांनी भारुडरुपी साहित्य संपदा लिहिली. हे कालबाह्य होऊ लागलेल्या भारूडाला 'विटी दांडू' या आगामी सिनेमातून पुन्हा संजीवनी देण्याचा प्रयत्न झाला आहे

अशोक समर्थ स्त्री वेशात!
मनोरंजनातून प्रबोधनाच्या उद्देशातून संत एकनाथ महाराजांनी भारुडरुपी साहित्य संपदा लिहिली. हे कालबाह्य होऊ लागलेल्या भारूडाला 'विटी दांडू' या आगामी सिनेमातून पुन्हा संजीवनी देण्याचा प्रयत्न झाला आहे. या आगामी सिनेमात प्रेक्षकांना भारूडाचा आस्वाद घेता येणार आहे. एक चालीस की लास्ट लोकल, सिंघम या बॉलीवूड सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते अशोक समर्थ यांच्यावर या सिनेमात एक भारुड चित्रित करण्यात आले आहे. पारतंत्र्याच्या जोखडाखाली दबले गेल्याने विचार आणि आचाराने गांजलेल्या समाजमनाला नवी उभारी देण्यासाठी तसेच त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी यासिनेमात अभिनेते अशोक समर्थ यांनी भारुड सादर केले आहे. 'गेला माझा इंग्लिश सासरा गेला'..... असे या भारुडाचे बोल असून मानवेल गायकवाड यांनी ते रचले आहे.