"अभिनेत्याला एका सिनेमासाठी जेवढी फी मिळते तेवढे आम्हाला...", रवीना टंडनचा सिनेइंडस्ट्रीबाबत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 06:14 PM2024-04-17T18:14:22+5:302024-04-17T18:14:48+5:30

Raveena Tandon : अभिनेत्री रवीना टंडनने ९०च्या दशकात तिला आलेल्या सिनेइंडस्ट्रीतील अनुभवाबद्दल सांगितले आहे.

"As much as an actor gets for a movie, we get paid...", Raveena Tandon reveals about the cineindustry | "अभिनेत्याला एका सिनेमासाठी जेवढी फी मिळते तेवढे आम्हाला...", रवीना टंडनचा सिनेइंडस्ट्रीबाबत खुलासा

"अभिनेत्याला एका सिनेमासाठी जेवढी फी मिळते तेवढे आम्हाला...", रवीना टंडनचा सिनेइंडस्ट्रीबाबत खुलासा

नव्वदच्या दशकातील हिट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रवीना टंडन(Raveena Tandon)ने तिच्या सिने करिअरबद्दल सांगितले आहे. एका मुलाखतीत रवीना म्हणाली की तिला नंतर समजले की ती तिच्या करिअरमध्ये रूढीवादी बनली आहे कारण त्या काळात अभिनेत्रींकडे खूप कमी पर्याय होते आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार काहीही निवडण्याचे स्वातंत्र्य नव्हते.

रवीना टंडन म्हणाली, जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली तेव्हा खूप स्टिरिओटाइपिंग होते. आम्ही एक-दोन चित्रपटात नाही तर १०-१२ चित्रपटात काम करायचो. चित्रपटात एखादा मोठा दिग्दर्शक किंवा मोठा स्टार असेल तर चित्रपट सुपरहिट होईल, असा विचार त्यावेळी असायचा. त्या काळात निवडीवर फारसे लक्ष नव्हते. त्या काळात अभिनेत्रींचे मानधनही फार नव्हते. एका चित्रपटातून नायक जे कमावत असे, ते मिळवण्यासाठी अभिनेत्रींना १५-१६ चित्रपट करावे लागायचे. तेव्हा करिअर प्लॅनिंग नव्हते त्यामुळे आम्हाला स्वतःला प्रस्थापित व्हायला खूप वेळ लागला.

आजच्या अभिनेत्रींसाठी चांगली परिस्थिती आहे
रवीना पुढे म्हणाली, आज अभिनेत्रींची परिस्थिती पूर्वीसारखी नाही. आता महिला कलाकार चांगल्या स्थितीत आहेत. आता त्यांना करिअरच्या सुरुवातीलाच चांगल्या भूमिका मिळत आहेत. आता काळ बदलला आहे. आता 'ओम शांती ओम'नंतर दीपिका पदुकोणला 'बाजीराव मस्तानी'सारखा चित्रपट पाच-सहा चित्रपटांनंतरच मिळतो, तर आमच्या काळात तिला अशा चित्रपटात काम करण्याची संधी फार मोठ्या करिअरनंतर किंवा २० चित्रपटांनंतरच मिळाला. आता आलिया भटला 'स्टुडंट ऑफ द इयर'नंतर लगेचच इम्तियाज अलीच्या 'हायवे' चित्रपटात काम करण्याची संधी मिळते. हा एक उत्तम कालावधी आहे.

रवीना शेवटची दिसली 'पटना शुक्ला' चित्रपटात
रवीनाचा शेवटचा चित्रपट 'पटना शुक्ला' २९ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. रवीना या चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत दिसली होती. याआधी रवीना 'कर्मा कॉलिंग' या वेब सीरिजमध्ये दिसली होती आणि येत्या काही दिवसांत तिच्याकडे बिनॉय गांधी यांचा 'घुडचढी' आणि 'वेलकम टू द जंगल' या मल्टीस्टारर चित्रपटासारखे प्रोजेक्टही आहेत.

Web Title: "As much as an actor gets for a movie, we get paid...", Raveena Tandon reveals about the cineindustry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.