अरविंद स्वामीचा १५ वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक
By Admin | Updated: March 31, 2016 15:36 IST2016-03-31T15:36:46+5:302016-03-31T15:36:46+5:30
रोजा चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा साऊथचा अभिनेता अरविंद स्वामी 15 वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार आहे

अरविंद स्वामीचा १५ वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई,दि. ३१ - 'रोजा' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा साऊथचा अभिनेता अरविंद स्वामी 15 वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार आहे. 1992 मध्ये आलेल्या मनिरत्नम दिग्दर्शित रोजा चित्रपटातून अरविंद स्वामीने बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. दिग्दर्शक तनुज भरमार यांच्या 'डीअर डॅड' चित्रपटातून पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास अरविंद स्वामीने तयारी सुरु केली आहे.
दिग्दर्शक तनुज भरमार यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची कथा आवडल्याने हा चित्रपट करण्याच निर्णय घेतल्यांच अरविंद स्वामीने सांगितलं आहे. 'अशा प्रकारचे चित्रपट फार कमी बनतात, ही कथा लोकांना सांगणं गरजेचं आहे. मी या चित्रपटात वडिलांची भुमिका बजावणार आहे', अशी माहिती अरविंद स्वामीने दिली आहे.
डिअर डॅड हा वडिल आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणार चित्रपट आहे. चित्रपटात वडिल आणि मुलाचा दिल्लीपासून ते मसुरीपर्यंतचा प्रवास दाखवला जाणार आहे. 1 एप्रिलला चित्रपटाचा पोस्टर रिलीज करण्यात येणार आहे.