लोकप्रिय अभिनेत्रीचा प्रणित मोरेला थेट सपोर्ट; म्हणाली, "शोचा विजेता तोच व्हायला हवा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:28 IST2025-11-19T12:26:10+5:302025-11-19T12:28:37+5:30

'बिग बॉस'ची एक्स स्पर्धक आणि लोकप्रिय अभिनेत्रीने उघडपणे प्रणित मोरेला पाठिंबा दिला आहे.

Arti Singh Supports Pranit More In Bigg Boss 19 House | लोकप्रिय अभिनेत्रीचा प्रणित मोरेला थेट सपोर्ट; म्हणाली, "शोचा विजेता तोच व्हायला हवा"

लोकप्रिय अभिनेत्रीचा प्रणित मोरेला थेट सपोर्ट; म्हणाली, "शोचा विजेता तोच व्हायला हवा"

Arti Singh Supports Pranit More: 'बिग बॉस सीझन १९' आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. घरात आपल्या विनोदी शैलीने सगळ्यांचं मनोरंजन करणारा आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध असलेला प्रणित मोरे सध्या या शोमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. अनेक मराठी कलाकार त्याला सपोर्ट करत असताना, आता लोकप्रिय अभिनेत्री आणि 'बिग बॉस'ची एक्स स्पर्धक आरती सिंगने उघडपणे प्रणित मोरेला पाठिंबा दिला आहे. आरती सिंगने प्रणितच्या खेळाचं आणि त्याच्या स्वभावाचं भरभरून कौतुक केलं. विनोदी शैली आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यालाच शोचा विजेता घोषित करायला हवं, असं मत तिनं व्यक्त केलं आहे.

आरती सिंगने प्रणित मोरेचं कौतुक केलं. बॉलिवूड बबल टेली या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, "मला वाटतं प्रणितनंच हा शो जिंकला पाहिजे. मला त्याचा गेम आवडत आहे. तो शोमध्ये कायम इतरांना हसवत असतो". ती पुढे म्हणाली की, "प्रणित कुणाला टोमणा मारायचा असेल तरी तो त्याच्या विनोदी शैलीतच उत्तर देतो. त्याचा स्वभाव खूप छान असून, घरातील इतर स्पर्धकांबरोबरचं त्याचं बॉण्डिंगही जबरदस्त आहे".

आरती सिंगने खेळातील मर्यादा आणि आदर राखण्यावर जोर देत म्हटले, "मला वाटतं की, तोच या शोचा विजेता झाला पाहिजे. जो या खेळात आपली प्रतिष्ठा राखत आहे, जो इतरांचा आदर करत आहे, तोच या शोचा विजेता झाला पाहिजे". यावेळी आरतीने 'बिग बॉस'मधील आधीच्या स्पर्धकांचाही संदर्भ दिला. तिने मृदुल तिवारीचं कौतुक करत म्हटलं की, "तोसुद्धा खेळात कायम भान ठेवून खेळत होता. त्याने टास्कसाठी कधी आरडाओरडा केला नाही, कुणाला मागे खेचण्यासाठी आपला गेम खेळला नाही किंवा टीआरपीसाठी मुद्दाम भांडणं केली नाहीत. तसंच आता मला प्रणितबाबत जाणवत आहे. त्यामुळे मला आता प्रणित आवडत आहे, त्याचा गेम आवडत आहे. त्यामुळे तोच शो जिंकला पाहिजे, असं वाटतं".


प्रणितला इतर कलाकारांचाही पाठिंबा
आरती सिंगसोबतच अनेक मराठी सेलिब्रिटी प्रणित मोरेला सपोर्ट करताना दिसत आहेत. यात शिव ठाकरे, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, अभिजीत केळकर यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. 'बिग बॉस'च्या घरातील प्रणितचा मनमिळाऊ स्वभाव, विनोदी शैली आणि टास्कदरम्यानचा संयम या गोष्टी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावरही त्याला जोरदार पाठिंबा मिळत आहे. आता स्टँडअप कॉमेडियन असलेला प्रणित मोरे हा 'बिग बॉस सीझन १९' जिंकून ट्रॉफी महाराष्ट्रात आणतो की नाही, हे पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
 

Web Title : आरती सिंह ने किया प्रणित मोरे को बिग बॉस 19 जीतने के लिए सपोर्ट

Web Summary : आरती सिंह ने प्रणित मोरे को बिग बॉस 19 के लिए सपोर्ट किया, उनकी हास्य और सम्मानजनक स्वभाव की प्रशंसा की। उनका मानना है कि उनकी ईमानदारी उन्हें एक योग्य विजेता बनाती है, अन्य मराठी हस्तियों से भी समर्थन मिल रहा है जो उनके मिलनसार व्यक्तित्व और शांति की प्रशंसा करते हैं।

Web Title : Arti Singh Supports Pranit More for Bigg Boss 19 Winner

Web Summary : Arti Singh supports Pranit More for Bigg Boss 19, praising his humor and respectful nature. She believes his integrity makes him a deserving winner, echoing support from other Marathi celebrities who admire his amiable personality and composure.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.