अर्जुन कपूरचं 'अँग्री' मीम इंटरनेटवर महाव्हायरल, नेमकी काय आहे यामागची गोष्ट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 16:08 IST2025-08-13T16:04:28+5:302025-08-13T16:08:19+5:30
अर्जुन कपूर व्हायरल मीममुळे चर्चेत आला आहे.

अर्जुन कपूरचं 'अँग्री' मीम इंटरनेटवर महाव्हायरल, नेमकी काय आहे यामागची गोष्ट?
Arjun Kapoor Angry Meme Viral Story: अर्जुन कपूर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पण त्यामागे कारण कोणताही नवीन चित्रपट नाही, तर एका मजेदार मीममुळे तो चर्चेत आला आहे. या व्हायरल क्लिपमध्ये अर्जुन एका पत्रकाराकडे रागाने पाहताना दिसतोय. बॅकग्राउंडमध्ये लावलेलं 'दस डॉन' हे हरियाणवी गाणं संपूर्ण मीमला आणखी मजेशीर बनवतंय. या मीमचा वापर सोशल मीडिया युजर्स वेगवेगळ्या संदर्भात करत आहेत आणि त्यावर भन्नाट कमेंट्स येत आहेत. पण हा मीम नक्की कुठून आलं? याबद्दल आपण जाणून घेऊयात. यामागची कहाणी थोडी जुनी आहे.
१९ मे २०१७ रोजी अर्जुन आणि श्रद्धा कपूरचा 'हाफ गर्लफ्रेंड' चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच दिवशी काही तासांनी दोघे मुंबईतील रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये मीडियाला भेटायला गेले. गप्पांच्या दरम्यान, एका पत्रकाराने बिहारमधील शूटिंगचा अनुभव विचारला. अर्जुनने उत्साहात सांगितले की त्याला तिथे खूप प्रेम मिळालं आणि लोकांनी फोटोसाठी गर्दी केली. त्याचे उत्तर संपताच, गर्दीत असलेल्या एका पत्रकाराने हलक्या-फुलक्या पण व्यंग्यात्मक स्वरात 'क्या बात है सर?' असं म्हटलं. यानंतर त्या पत्रकारानं त्याचा प्रश्न अर्जूनला विचारला. त्याच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी अर्जुनने त्याच्याकडे पाहत प्रतिप्रश्न केला "तू म्हणालास ना, क्या बात है?". यानंतर तो त्या पत्रकाराकडे एकटक पाहू लागला.
हा जुना व्हिडिओ कोणीतरी पाहिला आणि त्याचा हा भाग कापून सोशल मीडियावर पोस्ट केला. मग कुणीतरी त्यावर 'दस डॉन' हे गाणं लावलं आणि ही क्लिप अक्षरशः इंटरनेटवर तुफान व्हायरल झाली. चला तर मग पाहूया काही व्हायरल होत असलेले मीम्स.