‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 21:00 IST2018-10-16T18:23:12+5:302018-10-16T21:00:00+5:30
बॉलिवूड दिग्दर्शक यांचा सन २०१५ मध्ये रिलीज झालेला ‘नो एन्ट्री’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. निर्माता बोनी करू यांनी ‘नो एन्ट्री’चा सीक्वल घेऊन येण्याची तयारी सुरू केली असल्याचे कळतेय.

‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’!!
बॉलिवूड दिग्दर्शक यांचा सन २०१५ मध्ये रिलीज झालेला ‘नो एन्ट्री’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. सलमान खान, अनिल कपूर, फरदीन खान, बिपाशा बासू, लारा दत्त अशा अनेक स्टार्सच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट त्यावर्षीचा हिट चित्रपट होता. या चित्रपटाच्या रिलीजनंतरचं त्याच्या सीक्वलची चर्चा सुरु झाली होती. पण नंतर ही चर्चा थांबली. पण आता निर्माता बोनी करू यांनी ‘नो एन्ट्री’चा सीक्वल घेऊन येण्याची तयारी सुरू केली असल्याचे कळतेय. या चित्रपटासाठी हिरोही शोधला आहे. होय, हा हिरो कोण तर अर्जुन कपूर.
अर्जुन कपूरने अनीस बाज्मीच्या ‘मुबारकां’मध्ये दिसला होता. अर्जुनसोबत काम केल्यानंतर ‘नो एन्ट्री’च्या सीक्वलसाठी तो एकदम फिट असल्याचे अनीस बाज्मी यांचे मत पडले. काही दिवसांपूर्वी अनीस यांनी ‘नो एन्ट्री’च्या सीक्वलसंदर्भात सलमान खानसोबत चर्चा केली होती. पण सलमानने म्हणे, या सीक्वलमध्ये काम करण्यास नकार दिला. त्यामुळे या सीक्वलसाठी दुसऱ्या अभिनेत्याला साईन करण्याशिवाय अनीस यांच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही/ सूत्रांचे मानाल तर, अर्जुनला ‘नो एन्ट्री’च्या सीक्वलमध्ये काम करण्याची इच्छा आहे. पण सलमान परवानगी देत नाही, तोपर्यंत मी हा चित्रपट करणार नाही, असे म्हणे त्याने अनीस यांना स्पष्टपणे सांगितले होते.