अरबाज खान-शूराने दाखवली लेकीची पहिली झलक, बाळाचं ठेवलं हे नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:27 IST2025-11-19T17:26:18+5:302025-11-19T17:27:16+5:30
Arbaaz Khan-Shura Khan : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान गेल्या महिन्यात एका मुलीचे पालक बनले होते. अरबाज खान आणि शूरा खानने पोस्ट शेअर करून मुलगी झाल्याची गोड बातमी सांगितली होती.

अरबाज खान-शूराने दाखवली लेकीची पहिली झलक, बाळाचं ठेवलं हे नाव
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) आणि त्याची पत्नी शूरा खान (Shura Khan) गेल्या महिन्यात एका मुलीचे पालक बनले होते. अरबाज खान आणि शूरा खानने पोस्ट शेअर करून मुलगी झाल्याची गोड बातमी सांगितली होती. अरबाज खान आणि शूरा खान यांनी आपल्या मुलीचे नाव 'सिपारा' ठेवले आहे. आता या जोडप्याने लेकीची पहिली झलक दाखवली आहे.
अरबाज खान-शूराला गेल्या महिन्यात ५ ऑक्टोबरला कन्यारत्न प्राप्त झाले. आता जवळपास २२ महिन्यांनंतर या जोडप्याने आपल्या मुलीची पहिली झलक शेअर केली आहे. या जोडप्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये सिपाराचे छोटे पाय आणि चिमुकले हात दिसत आहेत. एका फोटोत अरबाज आणि शूराने मुलीचे लहान पाय हातात धरलेले दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये सिपाराने तिच्या वडिलांचा अंगठा पकडलेला दिसत आहे. या जोडप्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ''इवलेसे हात आणि इवलेसं पाऊल, पण आमच्या हृदयाचा सर्वात मोठा भाग.'' हा क्षण खूप खास होता, कारण ५ ऑक्टोबरला सिपाराच्या जन्मानंतरचा हा त्यांचा पहिला फॅमिली फोटो आहे.
अरबाज खान आणि शूराने त्यांच्या मुलीचे नाव ८ ऑक्टोबर रोजी चाहत्यांसोबत पोस्ट शेअर करून सांगितले होते. दोघांनी एक नोट पोस्ट करत लिहिले होते, 'सिपारा, तुझे स्वागत आहे'. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मेकअप आर्टिस्ट शूराला ४ ऑक्टोबरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवस आधीच कुटुंबाने एक छोटासा बेबी शॉवर साजरा केला होता, ज्यात सलमान खान आणि अरहान खान देखील सहभागी झाले होते.
अरबाज-शूराने २०२३ मध्ये केलं लग्न
अरबाज खान आणि शूरा खान २४ डिसेंबर २०२३ रोजी विवाहबंधनात अडकले होते. त्यांचा निकाह पूर्णपणे खासगी समारंभात झाला होता, जो अर्पिता खान शर्माच्या मुंबईतील घरी आयोजित करण्यात आला होता. लग्नानंतर अरबाजने पोस्ट शेअर करून लिहिले होते, ''आपल्या प्रियजनांच्या उपस्थितीत आम्ही एका नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे, फक्त तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.'' त्यांच्या लग्नाला फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रच बोलावले होते. या जोडप्याचे हे साधेपणाने केलेले लग्न खूप चर्चेत राहिले आणि आता त्यांच्या मुलीच्या जन्माने या आनंदात दुप्पट भर पडली आहे.