हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 08:57 IST2025-07-10T08:56:47+5:302025-07-10T08:57:22+5:30

काही दिवसांपूर्वीच अरबाजने शूरा गरोदर असून लवकरच बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता अरबाज शूराची काळजी घेताना दिसला. 

arbaaz khan holds shurra khan hand take care og pregnant wife video viral | हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल

हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान त्याच्या पर्सनल लाइफमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वयाच्या ५७व्या वर्षी अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. अरबाजची दुसरी पत्नी शूरा खान गरोदर आहे. काही दिवसांपूर्वीच अरबाजने शूरा गरोदर असून लवकरच बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता एका इव्हेंटदरम्यान अरबाज शूराची काळजी घेताना दिसला. 

अरबाज आणि शूराने 'आंखों की गुस्ताखियां' या सिनेमाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. यावेळी अरबाज आणि शूराने पापाराझींना फोटोसाठी पोझही दिल्या. अरबाज आपल्या प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला. शूराचा हात हातात घेऊन अरबाज तिला साथ देताना दिसला. यावेळी शूराचा बेबी बंपही दिसला. इन्स्टंट बॉलिवूड या पापाराझी पेजवरुन अरबाज-शूराचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 


अरबाजने १९९८ मध्ये मलायका अरोराशी लग्न केलं होतं. पण २०१७ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यांना २२ वर्षांचा अरहान हा मुलगा आहे. अरबाजने २०२३मध्ये मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी दुसरा निकाह केला. शूराचंही हे दुसरं लग्न आहे. आता अरबाज आणि शूरा लवकरच आईबाबा होणार आहेत. 

Web Title: arbaaz khan holds shurra khan hand take care og pregnant wife video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.