अनुष्का-विराट खुल्लमखुल्ला
By Admin | Updated: July 25, 2015 02:56 IST2015-07-25T02:56:19+5:302015-07-25T02:56:19+5:30
विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं नातं कुणापासूनच लपलेलं नाही. आता हे कपल तर अॅवॉर्ड फंक्शनमध्येही एकमेकांसोबत दिसत आहे

अनुष्का-विराट खुल्लमखुल्ला
विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं नातं कुणापासूनच लपलेलं नाही. आता हे कपल तर अॅवॉर्ड फंक्शनमध्येही एकमेकांसोबत दिसत आहे. नुकतेच अनुष्का-विराट ‘वोट ब्युटी अॅवॉर्ड- २०१५’ मध्ये उपस्थित होते. फंक्शनच्या वेळी अनुष्का-विराटने मीडियासोबतही चर्चा केली. परंतु दोघेही मनमोकळेपणाने काहीच बोलले नाहीत. दोघांनी सर्वांसमोर अद्याप त्यांच्या नात्याला स्वीकारलेले नाही; पण एका क्षणावेळी अनुष्काने विराटशी गळाभेट घेतली. हे पाहूनच सर्वांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.