हुमासोबत अनुरागची अभिनयात एन्ट्री
By Admin | Updated: December 9, 2014 00:52 IST2014-12-09T00:52:46+5:302014-12-09T00:52:46+5:30
दिग्दर्शक अनुराग कश्यप आता अभिनयात नशीब अजमावणार आहे. विशेष म्हणजे तो त्याच्या पहिल्याच चित्रपटात हुमा कुरैशीसोबत काम करताना दिसणार आहे.

हुमासोबत अनुरागची अभिनयात एन्ट्री
दिग्दर्शक अनुराग कश्यप आता अभिनयात नशीब अजमावणार आहे. विशेष म्हणजे तो त्याच्या पहिल्याच चित्रपटात हुमा कुरैशीसोबत काम करताना दिसणार आहे. हुमा आणि अनुरागची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे; पण आता या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सूत्रंनुसार प्रसिद्ध दिग्दर्शक सुधीर मिश्र यांच्या आगामी चित्रपटात अनुराग आणि हुमाची जोडी दिसेल. अद्याप या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही; पण तो एक पॉलिटिकल थ्रिलर असल्याचे कळते. चित्रपटात अनुरागची मुख्य भूमिका असणार आहे. अनुराग कश्यपचा ‘बॉम्बे वेल्वेट’ हा चित्रपट रिलीजसाठी तयार आहे. या चित्रपटात दिग्दर्शक करण जाैहर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हाच कित्ता सुधीर मिश्र यांनी गिरवला असून त्यांनी अनुरागला अभिनेता बनण्याची संधी दिली आहे.