अभिनयानंतर दिग्दर्शनात नशीब आजमावणार ‘न्यूटन’ गर्ल अंजली पाटील!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 11:01 AM2018-04-27T11:01:55+5:302018-04-27T16:31:55+5:30

भारताकडून आॅस्करसाठी पाठविण्यात आलेल्या ‘न्यूटन’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अंजली पाटील आता दिग्दर्शनात नशीब आजमावणार आहे. ‘सीएनएक्स ...

Anujali Patil 'Newton' girl will try luck in acting! | अभिनयानंतर दिग्दर्शनात नशीब आजमावणार ‘न्यूटन’ गर्ल अंजली पाटील!!

अभिनयानंतर दिग्दर्शनात नशीब आजमावणार ‘न्यूटन’ गर्ल अंजली पाटील!!

googlenewsNext
रताकडून आॅस्करसाठी पाठविण्यात आलेल्या ‘न्यूटन’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अंजली पाटील आता दिग्दर्शनात नशीब आजमावणार आहे. ‘सीएनएक्स मस्ती’शी संवाद साधताना अंजलीनेच याबाबतचा खुलासा केला आहे. नुकत्याच आॅनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध झालेल्या ‘मेरी निम्मो’विषयी बोलताना अंजलीने याबाबतचा खुलासा केला. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अंजलीने आतापर्यंत विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये छाप सोडली. आता दिग्दर्शनातही अंजलीकडून तशीच काहीशी अपेक्षा तिच्या चाहत्यांकडून व्यक्त केली गेली तर नवल वाटू नये. 



दरम्यान, अंजलीने सांगितले की, अभिनय क्षेत्रात वावरताना जगभरातील लोकांशी संवाद साधता आला. विविध भाषेच्या लोकांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे हा एक माझ्यासाठी अविस्मरणीय असा अनुभव होता. याच अनुषंगाने मी चित्रपट बनविण्याचा विचार करीत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला येत्या जुलै महिन्यात सुरुवात केली जाणार असल्याचेही अंजलीने स्पष्ट केले. दरम्यान, चित्रपटाच्या नावाबद्दल खुलासा करण्यास अंजलीने नकार दिला असला तरी ही एक फिचर फिल्म असेल, असे संकेत अंजलीकडून मिळाले. 



‘चक्रव्यूह’, ‘न्यूटन’ यासारख्या चित्रपटांमध्ये अंजलीचा अभिनय सर्वच पातळ्यांवर सरस ठरला. समीक्षकांनीदेखील अंजलीच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले होते. आता अंजली ‘मेरी निम्मो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. या चित्रपटातही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. चित्रपटात एका आठवर्षीय मुलासोबत तिची लव्हस्टोरी दाखविण्यात आली आहे. २७ एप्रिलला चित्रपट आॅनलाइन प्रदर्शित केला जात असून, प्रेक्षकांमधून त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. 

Web Title: Anujali Patil 'Newton' girl will try luck in acting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.