अंकुशचे फेक टिष्ट्वटर अकाउंट
By Admin | Updated: March 13, 2016 21:10 IST2016-03-13T21:10:43+5:302016-03-13T21:10:43+5:30
अंकुश चौधरीली तुम्ही ट्विटरवर फॉलो करताय..? मग जरा सांभाळूनच करा. सेलिब्रिटीजच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट सुरू करून त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अपलोड करण्याचे प्रमाण वाढले आहे.

अंकुशचे फेक टिष्ट्वटर अकाउंट
अंकुश चौधरीली तुम्ही ट्विटरवर फॉलो करताय..? मग जरा सांभाळूनच करा. सेलिब्रिटीजच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट सुरू करून त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अपलोड करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा फेक पेजेसना व्हेरीफाय न करता, अनेक फॅन्स आपल्या हिरोंचे प्रोफाइल लाइक करतात अन् अशा फेक अकाउंट्सना फॉलो करतात. आता अंकुश चौधरीचेसुद्धा ट्विटरवर फेक अकाउंट उघडण्यात आले आहे. अंकुश आर्मी या नावाने ते अकाउंट असून, त्यावर अंकुश चौधरीशी निगडित अनेक न्यूज, फोटोज, लेटेस्ट अपडेट दिले जातात. एवढेच नाही, तर अंकुश आता नव्या चित्रपटात सई ताम्हणकरसोबत झळकणार आहे, त्या चित्रपटाचे नाव ‘ब्रदर’ असून दिग्दर्शन संजय जाधव करणार असल्याचे त्यात मेन्शन केले आहे, तसेच स्वप्निल जोशीदेखील यांच्यासोबत असल्याचे ट्विट नुकतेच या अकाउंटवरून करण्यात आले होते. या संदर्भात ‘सीएनएक्स’ने संजय जाधव याच्याशी संपर्क साधला असता, संजय म्हणाला, ‘मी असा कोणताही चित्रपट करीत नाही. अंकुश आर्मी नावाचे ते अकाउंट फेक आहे. त्यामुळे अंकुशच्या चाहत्यांनी या फेक अकाउंटपासून जरा सावधच राहावे’