"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:01 IST2025-07-10T12:00:48+5:302025-07-10T12:01:35+5:30
अमृता सुभाषही आडनावाऐवजी तिच्या वडिलांचं नाव लावतं. पण, काही कारणांमुळे अमृताने आडनाव न लावण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
सिनेसृष्टीत येण्यासाठी काही कलाकार त्यांच्या नावात बदल करतात. तर काही जण आडनावाऐवजी वडिलांचं नाव लावतात. अमृता सुभाषही आडनावाऐवजी तिच्या वडिलांचं नाव लावतं. पण, काही कारणांमुळे अमृताने आडनाव न लावण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
अमृताने नुकतीच 'न्यूज १८ लोकमत' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आडनाव न लावण्यामागचं कारण सांगितलं. ती म्हणाली, "माझं आडनाव ढेंबरे आहे जे कोणालाच नीट उच्चारता येत नाही. माझ्या आईने ज्योती सुभाष नाव लावायला सुरुवात केली होती. जेव्हा मी पुरषोत्तम करंडक केलं तेव्हा मोहन गोखले परिक्षक होते. त्यामध्ये मला यशवंत स्वरानिभय मिळालं. ज्यामध्ये ते म्हणाले होते की अमृता आणि सुभाष. तर मग मी म्हटलं की ज्योती सुभाष यांची मुलगी म्हणून तुम्ही मला बक्षीस देत आहात तर ते मला नकोय".
"तर मग ते मोहन गोखले मला म्हणाले होते की अगं संस्कृतमध्ये अमृता सुभाष म्हणजे जिची वाणी अमृतासारखी आहे तिला आम्ही यशवंत स्वरानिभय दिलं, असं मला म्हणायचं होतं. मग संदेश मला म्हणाला की माझं आडनाव कुलकर्णी पण आपल्या क्षेत्रात कुलकर्णी खूप आहेत. त्यामुळे सुभाषच ठेव. बाबा खूप लवकर गेले त्यामुळे त्यांच्या नावावरुन ते आसपास असल्याचं वाटतं", असंही अमृताने सांगितलं.
दरम्यान, अमृताचा जारण सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला. या हॉरर सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. या सिनेमात अमृतासोबत अभिनेत्री अनिता दाते केळकरही मुख्य भूमिकेत आहे.