अमृताचा व्हिडीओ व्हायरल
By Admin | Updated: July 14, 2017 02:51 IST2017-07-14T02:51:43+5:302017-07-14T02:51:43+5:30
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचे आज असंख्य चाहते आहेत.

अमृताचा व्हिडीओ व्हायरल
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचे आज असंख्य चाहते आहेत. अमृताच्या काही चाहत्यांनी तिच्या प्रवासाचा एक छानसा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. अमृताच्या चाहत्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत अमृताच्या बालपणीपासून ते आतापर्यंतचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिने आजवर मिळवलेले यश या व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अमृताच्या फॅन्सने प्रयत्न केला आहे. अमृताच्या या व्हिडिओला आतापर्यंत १६ हजारांहूनही अधिक लाइक्स मिळाले असून अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्हाला देखील अमृताचा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल यात काहीच शंका नाही. अमृता आजच नाही तर तिच्या बालपणापासूनच अतिशय सुंदर असल्याचे आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर हिट ठरतोय.