अमृताच्या तालावर नवरा नाचणार
By Admin | Updated: April 4, 2015 23:20 IST2015-04-04T23:20:10+5:302015-04-04T23:20:10+5:30
हिंदीप्रमाणे मराठी स्टार्सही नृत्यात कमी नाहीत हे वेळोवेळी दिसले आहे. नच बलिये या डान्स शोमध्ये सचिन पिळगावकरने बाजी मारली होती.

अमृताच्या तालावर नवरा नाचणार
हिंदीप्रमाणे मराठी स्टार्सही नृत्यात कमी नाहीत हे वेळोवेळी दिसले आहे. नच बलिये या डान्स शोमध्ये सचिन पिळगावकरने बाजी मारली होती. आता अप्सरा आली फेम अमृता खानविलकरही आपल्या नृत्याची शानदार झलक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठी चित्रपटात आपल्या नृत्याने मोहिनी घातलेली अमृता नवरा हिमांशू मल्होत्राबरोबर नच बलियेत थिरकणार आहे. अमृता आणि हिमांशूच्या नृत्याची अदा सगळ्यांना किती घायाळ करते ते पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल.