'या' अभिनेत्रीनं प्रेमासाठी करिअर पणाला लावलं, नाकारली होती कोट्यावधी रूपयांची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 06:23 PM2022-02-10T18:23:16+5:302022-02-10T18:28:25+5:30

Amrita Rao : अमृताने तिच्या बॉलिवूड जर्नीबाबत सांगितलं आहे. तिने याचा खुलासाही केला आहे की, तिला यशराज बॅनरचे सिनेमे ऑफर झाले होते. पण तिने ते नाकारले.

Amrita Rao refused Yash Raj banner film because of this reason | 'या' अभिनेत्रीनं प्रेमासाठी करिअर पणाला लावलं, नाकारली होती कोट्यावधी रूपयांची ऑफर

'या' अभिनेत्रीनं प्रेमासाठी करिअर पणाला लावलं, नाकारली होती कोट्यावधी रूपयांची ऑफर

googlenewsNext

अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) आणि तिचा पती आरजे अनमोलचा यूट्यूब शो 'कपल ऑफ थिंग्स' फारच पसंत केला जात आहे. आता या  शो चा लेटेस्ट व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अमृताने तिच्या बॉलिवूड जर्नीबाबत सांगितलं आहे. तिने याचा खुलासाही केला आहे की, तिला यशराज बॅनरचे सिनेमे ऑफर झाले होते. पण तिने ते नाकारले.

व्हिडीओत अमृताने सांगितलं की, 'मी अनमोलसोबत श्रद्धा कपूरचा सिनेमा Luv Ka The End बघायला गेले होते. यात श्रद्धाने फार चांगलं काम केलं होतं. ती भूमिका बघून मी विचारात पडले मला असे क्लीन फॅमिली सिनेमे का मिळत नाहीत? मला हा सिनेमा बघून फारच डाऊन फील होत होतं. त्यावेळी अनमोलही इमोशनल झाला होता. त्यावेळी त्याने मला खूप सपोर्ट केला होता.

का नाकारले सिनेमे?

अमृताने पुढे सांगितलं की, २०११ मध्ये आदित्य सर (आदित्य चोप्रा) ने मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं. मी त्यांच्या कॅबिनमध्ये गेले. ते म्हणाले की, याआधी आपण दोनदा भेटलो आहोत. मी तुला दोन सिनेमे ऑफर केले होते. तू दोन्ही सिनेमे करू शकली नाही. कारण तुझे काही कन्फर्ट लेव्हल्स होते'. अमृताला 'नील एंड निक्की' आणि 'बचना ऐ हसीनों' सिनेमे ऑफऱ झाले होते. पण किसींग सीनमुळे तिने हे सिनेमे करण्यास नकार दिला होता.

आदित्यने दिली होती मोठी ऑफर

मीटिंग दरम्यान अमृताने आदित्य चोप्राला विचारलं की, हिरोईनचा रोल काय आहे? तर ते म्हणाले की, मी तुला फक्त एक सिनेमा ऑफर करत नाहीये. मी कलाकारांचा एक यशराज बॅंक तयार करत आहे. तुझी इमेज राजश्रीच्या सिनेमांसारखी आहे. पण मी आजच्या जनरेशनचे सिनेमे बनवतो. ज्यात कपलचं डेट करणं आणि त्यांचे किस करतानाचे सीन दाखवतो. तुला असे सिनेमे करायला आवडतील का? मी विचारात पडले आणि ते मला म्हणाले की, सिनेमे करायचे नसतील तर मला फक्त नो असा मेसेज कर. मी समजून घेईन.

अमृताने नाकारली ऑफर

अमृताने सांगितलं की, त्या रात्री मी जेव्हा घरी परतले तेव्हा फार कन्फ्यूजन होतं. मी विचार करत होते की, ज्या गोष्टीच्या मागे मी इतकी धावले, ते आता माझ्या समोर आहे तेव्हा मला वाटलं की, हे सगळं मला नको आहे. मग मी आदित्य सरांना मेसेज केला की, सर मी एका रिलेशनशिपमध्ये आहे आणि मी या भूमिकांसोबत न्याय करू शकणार नाही. त्यांचा रिप्लाय आला होता की, काही हरकत नाही. समजू शकतो. आशा आहे की, भविष्यात मी तुला असा रोल देऊ शकेन जो करण्यात तुला सहजता असेल.
 

Web Title: Amrita Rao refused Yash Raj banner film because of this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.