‘देवा’साठी अमितराजचा गजर
By Admin | Updated: August 25, 2016 02:17 IST2016-08-25T02:17:31+5:302016-08-25T02:17:31+5:30
अमितराज हा नेहमीच वेगळ्या पठडीतील संगीत देण्यासाठी ओळखला जातो

‘देवा’साठी अमितराजचा गजर
अमितराज हा नेहमीच वेगळ्या पठडीतील संगीत देण्यासाठी ओळखला जातो. अनेक मराठी चित्रपटांसाठी अमितने लाजवाब संगीत दिले आहे. ‘आवाज वाढव डिजे’, ‘गुलाबाची कळी’, ‘देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी....’, अशी अनेक हिट गाणी अमितने आजपर्यंत मराठी इंडस्ट्रीला दिली आहेत. आता ‘देवा’ या आगामी चित्रपटासाठी अमितराज ‘गजर’ नावाचा नवीन संगीतप्रकार मराठीत घेऊन येणार आहे. याबद्दल अमितराज सांगतो, ‘गजर’ हा संगीतप्रकार मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळत नाही. हा प्रकार कोकणात जास्त ऐकायला मिळतो. देवा या चित्रपटाला कोकणाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे मी हा प्रकार या चित्रपटात वापरण्याचा निर्णय घेतला. ‘गजर’ म्हणजे देवाचे एका विशिष्ट स्वरात नामस्मरण करणे. ‘गजर’ गाण्यासाठी आवाजातील चढउतार हा फार महत्वाचा असतो. ‘गजर’ गाताना तो थेट प्रेक्षकांच्या मनाला जाऊन भिडला पाहिजे. या चित्रपटासाठी मी एकूण चार गाणी तयार केली आहेत. यातील काही गाणी आदर्श शिंदे गाणार आहे.