​अमिताभ यांचा ‘टीबी मुक्त भारत’चा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2016 05:35 PM2016-03-07T17:35:40+5:302016-03-07T10:35:40+5:30

क्षयरोग अर्थात टीबीच्या (Tuberculosis) आजाराशी दोन हात करून तो परतवून लावणारे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आज सोमवारी ‘टीबी मुक्त ...

Amitabh's 'TB free India' resolution | ​अमिताभ यांचा ‘टीबी मुक्त भारत’चा संकल्प

​अमिताभ यांचा ‘टीबी मुक्त भारत’चा संकल्प

googlenewsNext
षयरोग अर्थात टीबीच्या (Tuberculosis) आजाराशी दोन हात करून तो परतवून लावणारे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आज सोमवारी ‘टीबी मुक्त भारत’चा संकल्प सोडला. येत्या २४ मार्चला जागतिक क्षयरोग दिन आहे. या पार्श्वभूमीवर अमिताभ यांनी ‘टीबी मुक्त भारत’साठी काम करण्याचा संकल्प केला. भारत क्षयरोगापासून मुक्त होत नाही, तोपर्यंत मी क्षयरोग निर्मूलनासाठी काम करीत राहिल, असे अमिताभ म्हणाले. ८ वर्षांपूर्वी मी पोलिओमुक्त अभियानाशी जुळलो होतो. जनजागृती, प्रतिबंधक उपाय आदी संयुक्त प्रयत्नांद्वारे भारताने पोलिओला परतवून लावले. याचप्रमाणे ‘टीबी मुक्त भारत’चे लक्ष्यही आपण गाठू, असा मला विश्वास आहे, अशा दृढ आशावाद त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
 सन २००० मध्ये अमिताभ यांनाही क्षयरोगाने ग्रासले होते. त्यावेळी ‘कौन बनेगा करोड़पति’ हा शो त्यांच्या हातात होता. यानंतर सुमारे वर्षभर अमिताभ यांनी औषधोपचार घेतला आणि क्षयरोगापासून मुक्ती मिळवली. अमिताभ हे ‘टीबी-मुक्त भारत’ अभियानाचे ब्रांड अ‍ॅम्बिसीडर आहेत.
 
 

Web Title: Amitabh's 'TB free India' resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.