बिग बॉसचं उद्घाटन सलमानसोबत करणार अमिताभ बच्चन?
By Admin | Updated: October 5, 2015 13:36 IST2015-10-05T13:36:14+5:302015-10-05T13:36:14+5:30
छोट्या पडद्यावरच्या सगळ्यात वादग्रस्त अशा बिग बॉसच्या नवव्या एपिसोडमध्ये सलमान खानसबोत अमिताभ बच्चनही यजमानपद भूषवतील अशा चर्चेला बॉलीवूडच्या सर्कलमध्ये उधाण आलं

बिग बॉसचं उद्घाटन सलमानसोबत करणार अमिताभ बच्चन?
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - छोट्या पडद्यावरच्या सगळ्यात वादग्रस्त अशा बिग बॉसच्या नवव्या एपिसोडमध्ये सलमान खानसबोत अमिताभ बच्चनही यजमानपद भूषवतील अशा चर्चेला बॉलीवूडच्या सर्कलमध्ये उधाण आलं आहे. अमिताभनी याआधी तिस-या एपिसोडमध्ये सहभाग घेतला होता. ११ ऑक्टोबर रोजी कलर्स वाहिनीवर बिग बॉसच्या नवव्या एपिसोडचे उद्घाटन होणार असून हा दिवस अमिताभ बच्चन यांचा जन्मदिवस आहे. हा निव्वळ योगायोग आहे की जाणूनबुजून केलेली व्यावसायिक खेळी आहे हे आयोजकांनाच माहीत.
चंदेरी दुनियेला वाहिलेल्या वेबसाईट्सच्या दाव्यांनुसार अमिताभ बच्चन यापूर्वी बिग बॉसचे होस्ट होते आणि त्यांच्या जन्मदिनी नववा एपिसोड सुरू करणे ही बच्चन यांना आदरांजली असल्याची सलमान खानची प्रतिक्रिया आहे.
अमिताभ खरोखर बिगबॉस होस्ट करणार का हे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं नसलं तरी सलमान व अमिताभ दोघांच्याही चाहत्यांच्या मनात याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.