अन् आलियाचा बॉडीगार्ड झाला गायब..!

By Admin | Updated: April 22, 2017 03:09 IST2017-04-22T03:09:34+5:302017-04-22T03:09:34+5:30

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट हिने अशाच एका लेट नाईट पार्टीला अलीकडे हजेरी लावली. पार्टी मस्तपैकी रंगली. आलियानेही या पार्टीत मस्तपैकी धम्माल

Alia's bodyguard disappeared ..! | अन् आलियाचा बॉडीगार्ड झाला गायब..!

अन् आलियाचा बॉडीगार्ड झाला गायब..!

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट हिने अशाच एका लेट नाईट पार्टीला अलीकडे हजेरी लावली. पार्टी मस्तपैकी रंगली. आलियानेही या पार्टीत मस्तपैकी धम्माल मस्ती केली. रात्री उशीरा ३ वाजता पार्टी करून आलिया घरी परतली, तेव्हा आलियाच्या आईचा राग अनावर झाला होता. राग इतका, की आलियाच्या आईने आलियाच्या बॉडीगार्डला नोकरीवरून काढून टाकेल.
त्या दिवशी आलिया तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी गेली होती. आलिया सिद्धार्थच्या घरी पोहोचली आणि तिने तिचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड दोघांनाही तिथेच थांबायला सांगितले. पण हे दोघेही काही वेळातच गायब झाले. आलियाने स्टाफला कॉल केल्यावर ड्रायव्हर परत आला. पण अनेक कॉल्स केल्यानंतरही बॉडीगार्डचा काहीही थांगपत्ता लागेना. अखेर बऱ्याच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर आलिया घरी जाण्यासाठी निघाली, तर बॉडीगार्ड अचानक तिच्यासमोर आला. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण आलिया लगेच सावध झाली. कारण बॉडीगार्ड मद्याच्या नशेत होता. मग काय, आलियाने बॉडीगार्डशिवायच घरी पोहोचली. घरी पोहोचताच तिने हा सगळा किस्सा आईला सांगितला. याचा परिणाम म्हणजे, आलियाच्या आईने बॉडीगार्डची नोकरीवरून हकालपट्टी केली. मी नशेत नव्हतो, असे बॉडीगार्ड शेवटपर्यंत सांगत होता. पण आलियाची आई काहीही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती.

Web Title: Alia's bodyguard disappeared ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.