आलिया भट्टला पुन्हा करावा लागला Oops Moment चा सामना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 20:13 IST2017-03-16T14:43:45+5:302017-03-16T20:13:45+5:30
बॉलिवूडची दिवा अॅक्ट्रेस आलिया भट्टला पुन्हा एकदा उप्स मोमेंटचा सामना करावा लागला. ‘झी सिने अवॉर्ड्स २०१७’च्या सोहळ्यात परफॉर्मन्स करताना ...

आलिया भट्टला पुन्हा करावा लागला Oops Moment चा सामना!
ब लिवूडची दिवा अॅक्ट्रेस आलिया भट्टला पुन्हा एकदा उप्स मोमेंटचा सामना करावा लागला. ‘झी सिने अवॉर्ड्स २०१७’च्या सोहळ्यात परफॉर्मन्स करताना तिच्यासोबत हा संपूर्ण प्रकार घडला. त्याचे झाले असे की, अवॉर्ड सोहळ्यात ती परफॉर्मन्स करणार होती. त्यासाठी ती पूर्णत: तयार आणि उत्साहित होती. जेव्हा तिचा परफॉर्मन्स सुरू झाला, त्याच्या काही मिनिटानंतरच तिच्या विगचा एक भाग स्टेजवर पडला. ज्यामुळे तिला उप्स मोमेंटचा सामना करावा लागला.
![]()
यापूर्वीदेखील आलियाला उप्स मोमेंटचा सामना करावा लागला होता. यावेळेस मात्र आलियाचा उत्साह बघण्यासारखा होता. विग पडल्यानंतरही तिने जिद्दीने परफॉर्मन्स पूर्ण केला. ती स्टेज सोडून गेली नाही, तिने तिचा परफॉर्मन्स पूर्ण केला. यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की, आलिया ही बॉलिवूडची सुपरस्टार असून, कुठल्याही परिस्थितीत ती स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपड करीत असते. त्यामुळेच कदाचित आलिया सध्या बॉलिवूडची दिवा स्टार असून, तिच्या फॅन्सच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.
विशेष म्हणजे जेव्हा हा प्रकार झाला तेव्हा उपस्थितांना हसू आवरता आले नाही. आलियाच्या ही बाब लक्षात आली; मात्र तिने तिच्या परफॉर्मन्सकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. तिने तिचा परफॉर्मन्स पूर्ण केला. त्यानंतर बोलताना ती म्हणाली की, ‘करण जोहर माझ्यासाठी खूप मोठी हस्ती आहे’ एवढे बोलून तिने स्टेज सोडले.
![]()
जेव्हा करणने तिला यासर्व प्रकाराबाबत विचारणा केली तेव्हा तिने माझ्या वडिलानंतर तुम्हाला माझ्या आयुष्यात स्थान असल्याचे म्हटले. असो, परंतु उप्स मोमेंटला ज्या पद्धतीने आलियाने हाताळले ते खरोखरच वाखणण्याजोगे होते. या सोहळ्यातील काही फोटोज् आलियाने इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.