आलियासाठी बेबो ‘मैदानात’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 01:46 IST2016-06-25T01:46:41+5:302016-06-25T01:46:41+5:30

‘उडता पंजाब’मुळे करिना कपूर व आलिया भट्ट यांच्यात चांगलीच मैत्री झालीय, असे दिसतेय. अलीकडे एका कार्यक्रमात करिनाने आलियाला किस करून तिच्या अभिनयाचे अगदी तोंडभरून कौतुक केले.

Alia for Bebo 'in the field'! | आलियासाठी बेबो ‘मैदानात’!

आलियासाठी बेबो ‘मैदानात’!

‘उडता पंजाब’मुळे करिना कपूर व आलिया भट्ट यांच्यात चांगलीच मैत्री झालीय, असे दिसतेय. अलीकडे एका कार्यक्रमात करिनाने आलियाला किस करून तिच्या अभिनयाचे अगदी तोंडभरून कौतुक केले. यानंतर नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत बेबो आलियाला प्रोटेक्ट करताना दिसली. मुलाखतीदरम्यान पत्रकाराने आलियाला तिच्या आणि सिद्धार्थच्या ब्रेकअपबाबत प्रश्न विचारला. यावर मी सिंगल आहे. माझे कुणाशीही ब्रेकअप वगैरे झालेले नाही. माझे कधी पॅचअप झाले, कधी ब्रेकअप झाले आणि पुन्हा कधी पॅचअप होणार, हे मला तुमच्याकडूनच (मीडिया) कळते, असे काहीशा नाराजीच्या सूरात आलिया म्हणाली.

Web Title: Alia for Bebo 'in the field'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.