तिन्ही खानांना जे जमले नाही ते अक्षयने करुन दाखवले

By Admin | Published: August 21, 2016 10:35 AM2016-08-21T10:35:29+5:302016-08-21T10:35:29+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा रुस्तम हा २०१६ मधील तिसरा चित्रपट आहे. आणि सर्वचं चित्रपटाने तिकिटबारीवर १०० करोडचा गल्ला जमवला आहे.

Akshay showed that he did not have all the three Khans | तिन्ही खानांना जे जमले नाही ते अक्षयने करुन दाखवले

तिन्ही खानांना जे जमले नाही ते अक्षयने करुन दाखवले

googlenewsNext

नामदेव कुंभार/ ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ : अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्या बॉक्स ऑफिसवर १०० करोड रुपयांची कमाई केली आहे. टिनू देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षय कुमारची प्रमुख भूमिका आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा रुस्तम हा २०१६ मधील तिसरा चित्रपट आहे. आणि सर्वचं चित्रपटाने तिकिटबारीवर १०० करोडचा गल्ला जमवला आहे. एअर लिफ्ट या सत्यकथेवर आधारीत सिनेमातल्या रणजीत कटयालची भूमिका गाजवल्यानंतर रुस्तम पावरी ही देखील सत्यकथेवर आधारीत भूमिका अक्षयने यशस्वी करून दाखवेली आहे.

या वर्षी अक्षयने केलेल्या सर्वच चित्रपटाने तिकिटखिडकीवर १०० करोड रुपयांचा किंवा त्यापेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. हा अक्षयच्या नावावर झालेला नवा विक्रम आहे. जे कोणत्याही कलाकाराला जमले नाही. बॉलिवूडच्या ३ खानांना देखील जे करता आले नाही ते खिलाडी अक्षयने केले आहे. एका वर्षात सलग ३ चित्रपट तिकिटबारीवर १०० करोडचा व्यवसाय. अक्षय वर्षातून ४-५ चित्रपट करत असतो त्यामधील त्याचे ३ तरी चित्रपट चागंला व्यवसाय करतातचं. वर्षाच्या सुरवातीला एअरलिफ्ट, त्यानंतर हाऊसफुल ३ आणि आता रुस्तम असे तिन चित्रपट हीट दिले आहे. रुस्तमहा अक्षयचा सहावा चित्रपट आहे ज्याने १०० करोडचा व्यवसाय केला आहे.

यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या आणि पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच चित्रपटांच्या यादीत अक्षय कुमारच्या दोन चित्रपटांचा समावेश आहे. यापूर्वी हाऊसफुल ३ आणि एअरलिफ्ट या दोन चित्रपटांनी ही कामगिरी केली होती. या दोन्ही चित्रपटांनीदेखील १०० कोटींहून अधिक व्यवसाय केला होता. खिलाडी अक्षयसाठी हे वर्ष चांगलच यशस्वी आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

 

Web Title: Akshay showed that he did not have all the three Khans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.