अक्षय साकारणार दादा कोंडके...

By Admin | Updated: March 4, 2016 04:28 IST2016-03-04T01:11:07+5:302016-03-04T04:28:04+5:30

बॉलीवूडमधील खिलाडी कुमार म्हणजेच, अक्षय कुमार त्याच्या स्टंट अन हटके अंदाजमुळे प्रसिद्ध आहे. अक्षयने एका मराठी चित्रपटामध्ये गेस्ट अ‍ॅपियरन्स करून मराठी रसिकांची मने जिंकली होती

Akshay Sarkar to be able to do Dada Kondke ... | अक्षय साकारणार दादा कोंडके...

अक्षय साकारणार दादा कोंडके...

बॉलीवूडमधील खिलाडी कुमार म्हणजेच, अक्षय कुमार त्याच्या स्टंट अन् हटके अंदाजमुळे प्रसिद्ध आहे. अक्षयने एका मराठी चित्रपटामध्ये गेस्ट अ‍ॅपियरन्स करून मराठी रसिकांची मने जिंकली होती. तो उत्तम मराठी बोलतो हे तर आपल्याला माहीतच आहे आणि त्याच्या मराठीतील आगमनानंतर त्याचे मराठी चित्रपटाविषयी असणारे प्रेमदेखील दिसून येते. अक्षय आता अ‍ॅज अ हीरो म्हणून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करीत असल्याचे समजते. हा खिलाडी कुमार चित्रपट बनवतोय ते पण लिजेंडरी दादा कोंडके यांच्या बायोपिकवर.
‘एकटा जीव सदाशिव’ या दादा कोंडके यांच्या आत्मचरित्राचे हक्क अक्षयने विकत घेतले असल्याचे समजते. एवढेच नाही, तर त्याने एका कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपट करण्याची इच्छा असल्याचेही बोलून दाखविले होते. आता तो चित्रपट दादा कोंडके यांच्या जीवनावरील आहे का, हे आपल्याला लवकरच समजेल. बॉलिवूड कलाकारदेखील आता मराठी चित्रपटांकडे वळत असून मराठी सिनेमे करण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. आता आपला स्टंट मॅन अक्षय मराठीत काय वेगळे करतोय, याकडेच त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहील.

Web Title: Akshay Sarkar to be able to do Dada Kondke ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.