अक्षयने नाकारले सनीसोबतचे 2 चित्रपट
By Admin | Updated: November 26, 2014 00:33 IST2014-11-26T00:33:05+5:302014-11-26T00:33:05+5:30
पि ज्ज थ्रीडी या चित्रपटातील अक्षय ओबेरॉय याने सनी लियोनसोबतच्या दोन चित्रपटांना नकार दिला आहे. त्याला लीला हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता; पण तिने हा चित्रपट करायला नकार दिला.

अक्षयने नाकारले सनीसोबतचे 2 चित्रपट
पि ज्ज थ्रीडी या चित्रपटातील अक्षय ओबेरॉय याने सनी लियोनसोबतच्या दोन चित्रपटांना नकार दिला आहे. त्याला लीला हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता; पण तिने हा चित्रपट करायला नकार दिला. त्यावेळी त्याने पिज्ज थ्रीडीच्या प्रमोशनसाठी दिलेल्या तारखा आणि लीलाच्या शूटिंग तारखा यांचा मेळ बसत नसल्याचे सांगितले होते. आता त्याला सनीसोबतच ‘बेईमान इश्क’ची ऑफर मिळाली. तो इंडो ब्रिटिश चित्रपट असलेल्या बॉम्बरियामध्ये बिझी आहे. त्यामुळे हा चित्रपटही त्याने नाकारला. त्याची कारणो त्यालाच ठाऊक.