केप टाऊनमध्ये अनुष्का शर्मा सोबत अक्षय कुमारने केला लंच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 13:08 IST2018-01-03T07:38:39+5:302018-01-03T13:08:39+5:30

बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विरोट कोहली सध्या केप टाऊनमध्ये आहेत. विराट  साऊथ आफ्रिकेमध्ये दौऱ्यावर ...

Akshay Kumar at the Cape Town with Anushka Sharma! | केप टाऊनमध्ये अनुष्का शर्मा सोबत अक्षय कुमारने केला लंच !

केप टाऊनमध्ये अनुष्का शर्मा सोबत अक्षय कुमारने केला लंच !

लिवूड स्टार अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विरोट कोहली सध्या केप टाऊनमध्ये आहेत. विराट  साऊथ आफ्रिकेमध्ये दौऱ्यावर गेला आहे यावेळी त्याच्यासोबत पत्नी अनुष्का सुद्धा आहे. अनुष्का व्यतिरिक्त अन्य खेळाडूंच्या पत्नीसुद्धा सध्या साऊथ आफ्रिकेमध्ये आहेत. सध्या सोशल मीडियावर विराट आणि अनुष्काचे फोटो केप टाऊनमधले फोटो व्हायरल होताना दिसतायेत ज्यांना फॅन्स भरभरुन लाईक करतायेत. 




एका फोटोमध्ये विराट आणि अनुष्कासोबत बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजे अर्थात अक्षय कुमारसुद्धा दिसतो आहे. अक्षय कुमार न्यू ईअरच्या सेलिब्रेशन तसेच पत्नी ट्विंकल खनाच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबासह केप टाऊनमध्ये गेला आहे. अक्षयसोबत विराट आणि अनुष्काने केप टाऊनमध्ये एकत्र लँच सुद्धा केला.  



लवकरच अक्षय कुमाराचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातून अक्षयची पत्नी ट्विंकल खना निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या चित्रपटात अक्षय अरूणाचलम मुरूगनाथनची भूमिका साकारताना दिसतोय. अरूणाचलम यांनी आपल्या गावातील महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देऊ, अशी शपथ घेतली होती. 

पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षय व राधिका आपटे या दोघांशिवाय सोनम कपूरही मुख्य भूमिकेत आहेत. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटासोबत अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवतेय. हा चित्रपट ट्विंकलने प्रोड्यूस केलेला आहे. चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे; तर सोनम अक्षयवर प्रेम करत असल्याचे दाखवण्यात येणार आहे. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

ALSO READ :  रणबीर कपूरसोबत ज्या ड्रेसमध्ये फिरली होती; तोच घालून पती विराटसोबत दिसली अनुष्का शर्मा!

अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळख मिरवणाºया अक्षय कुमारने मागील काही वर्षांपासून सामाजिक विषयाला वाहिलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून समीक्षकांचे लक्ष वेधले आहे. या दरम्यान त्याने काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. त्याचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपटदेखील याच पठडीतला चित्रपट आहे. यापूर्वी अक्षय ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपटही असाच  सामाजिक विषयाला वाहिलेला होता. 

 

Web Title: Akshay Kumar at the Cape Town with Anushka Sharma!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.