शाहरुख बनणार अजरुनचा मोठा भाऊ
By Admin | Updated: December 10, 2014 23:59 IST2014-12-10T23:21:57+5:302014-12-10T23:59:17+5:30
अशोक कुमार, किशोर कुमार आणि अनुप कुमार यांचा अभिनय असलेल्या ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटाचा रिमेक बनवला जाणार आहे.

शाहरुख बनणार अजरुनचा मोठा भाऊ
अशोक कुमार, किशोर कुमार आणि अनुप कुमार यांचा अभिनय असलेल्या ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटाचा रिमेक बनवला जाणार आहे. रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात शाहरुख खान मोठय़ा भावाच्या भूमिकेत असून त्याच्या लहान भावाची भूमिका अजरुन कपूर करणार आहे. अजरून कपूर किशोर कुमार किंवा अनुप कुमार यांच्यापैकी कोणाची भूमिका निभावेल हे मात्र अद्याप निश्चित झालेले नसल्याचे सूत्रंकडून कळते. त्याशिवाय मधुबालाच्या भूमिकेत कोण दिसणार याबाबतही काहीही निश्चित झालेले नाही; पण सध्या ऐश्वर्या रॉयच्या नावावर विचार सुरू असल्याचे सूत्र सांगतात. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. पुढील वर्षाच्या मध्यात चित्रपटाचे शुटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.