अजय देवगणने केली चाहत्यांची निराशा
By Admin | Updated: December 8, 2014 23:33 IST2014-12-08T23:33:34+5:302014-12-08T23:33:34+5:30
महिनाभर निराशेचे वातावरण असलेल्या बॉक्स ऑफिस आणि पर्यायाने चित्रपट चाहत्यांना ‘अॅक्शन ज्ॉक्सन’ चित्रपटाकडून यशाची अपेक्षा होती.

अजय देवगणने केली चाहत्यांची निराशा
‘अॅक्शन ज्ॉक्सन’ चित्रपट फ्लॉप : तीन दिवसांची कमाई फक्त 3क् कोटी
महिनाभर निराशेचे वातावरण असलेल्या बॉक्स ऑफिस आणि पर्यायाने चित्रपट चाहत्यांना ‘अॅक्शन ज्ॉक्सन’ चित्रपटाकडून यशाची अपेक्षा होती. अजयची अॅक्शनदृश्ये आणि गाणी तसेच प्रभुदेवाचे दिग्दर्शन असल्याने चित्रपटाविषयी उत्सुकताही जास्त होती. मात्र शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मीडिया आणि चाहत्यांकडून चित्रपटाने निराशा केल्याचा सूर उमटला. त्याचा परिणाम इतर प्रेक्षकांवर झाल्याने चित्रपटाची अवस्था फारशी चांगली नाही.
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘अॅक्शन ज्ॉक्सन’ने 1क् कोटींची कमाई केली. शनिवार आणि रविवार या सलग सुटय़ांचा फायदा चित्रपटाला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. शनिवारी साधारण 1क् कोटींच्या आसपासच कमाई झाली, तर रविवारी मात्र 1क् कोटी कमाई करणोही अवघड असल्याचे चित्र होते. सोमवारी तर चित्रपटाची अवस्था वाईट असून कमाई खूपच कमी आहे. एकंदर तीन दिवसांत चित्रपटाने 3क् कोटींच्या आसपास कमाई केली आहे.
या चित्रपटाचे निर्मितीमूल्य 7क् कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे चित्रपटाने केलेली कमाई पाहता त्याला अपयशी चित्रपटांच्या यादीत स्थान मिळाले आहे. तसेच यापुढे तो आपले निर्मितीमूल्य वसूल करण्याची शक्यताही नाही. या चित्रपटात पैसे गुंतवलेल्या लोकांनाही खूप नुकसान सहन करावे लागेल, असे चित्रपट व्यवसायातल्या जाणकारांनी सांगितले. तसेच पहिल्या आठवडय़ात चित्रपट 4क् ते 5क् कोटींच्या आसपास व्यवसाय करू शकतो. एवढी कमाई केली तरी चित्रपटाला अपयशी चित्रपटांच्या पंक्तीतच स्थान मिळणार आहे, कारण मीडिया आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अत्यंत वाईट आहेत. अजयचे चाहते तर त्याच्यावर नाराज झाले आहेत. ‘हिंमतवाला’ चित्रपटानंतर असा निराशेचा अनुभव देणारा ‘अॅक्शन ज्ॉक्सन’ हा अजय देवगणचा दुसरा चित्रपट आहे.
याआधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास, करण जोहरच्या कंपनीत बनलेला ‘उंगली’ 14 कोटींच्या आसपास कमाई करत बॉक्स ऑफिसमधून बाहेर पडला. तसेच या चित्रपटाबरोबर प्रदर्शित झालेला डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदींच्या ‘ङोड प्लस’ने 6क् लाख, तर ‘जिद’ने 5 कोटींच्या आसपास कमाई केली. हे तीनही चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. तर सैफ अली खानच्या ‘हॅपी एंडिंग’ चित्रपटाने 19 कोटींच्या आसपास कमाई करत तोही बॉक्स ऑफिसमधून बाहेर पडला आहे.
येत्या शुक्रवारी कोणताही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार नाही.
च्अॅक्शन ज्ॉक्सन - फ्लॉप
च्उंगली - फ्लॉप
च्जिद - फ्लॉप
च्ङोड प्लस - फ्लॉप
च्हॅपी एंडिंग - फ्लॉप