ब्रेकअपच्या 15 वर्षांनंतर ऐश्वर्या-विवेकचा एकत्र फोटो झाला व्हायरल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 15:14 IST2018-01-19T15:11:28+5:302018-01-19T15:14:47+5:30
ब्रेकअपच्या जवळपास 15 वर्षांनंतर ऐश्वर्या आणि विवेकचा एकत्र फोटो क्लिक करण्यात आला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत...

ब्रेकअपच्या 15 वर्षांनंतर ऐश्वर्या-विवेकचा एकत्र फोटो झाला व्हायरल !
मुंबई: इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांची पत्नी 6 दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत. काल (18 जानेवारी) मुंबईमध्ये त्यांनी बॉलिवूडमधील कलाकारांची भेट घेतली. यावेळी बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, अभिषेक बच्चन, करण जोहर, इम्तियाज अली, मधुर भंडारकर, विवेक ओबेरॉय, प्रसून जोशी यांच्यासहीत अनेक कलाकार उपस्थित होते.
बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत भेटीचा हा क्षण सर्वांनी कॅमे-यात कैद केला. खुद्द बिग बी यांनी एक शानदार सेल्फी क्लिक केला. या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अमिताभ आणि नेतान्याहू यांच्याव्यतिरिक्त ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि विवेक ओबेरॉय हे तिघेही दिसत आहेत. म्हणजेच ब्रेकअपच्या जवळपास 15 वर्षांनंतर ऐश्वर्या आणि विवेकचा एकत्र फोटो क्लिक करण्यात आला आहे. दोघांच्याही चाहत्यांनी ही गोष्ट लगेच हेरली. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ऐश-विवेक दोघांच्या चाहत्यांमध्ये या फोटोबाबत बरीच चर्चा सुरू आहे.
ब्रेकअप आणि लग्नानंतर पहिल्यांदाच दोघं एकत्र पाहायला मिळाले. पण संपूर्ण कार्यक्रमात दोघांनी एकमेकांपासून दूर राहणंच पसंत केलं. या कार्यक्रमात विवेक त्याची पत्नी प्रियंकासोबत होता.
Will my Bollywood selfie beat @TheEllenShow Hollywood selfie at the Oscars? @SrBachchan@juniorbachchan@rajcheerfull@imbhandarkar@vivek_oberoi @ pic.twitter.com/v1r0GIhKLy
— Benjamin Netanyahu (@netanyahu) January 18, 2018