हसलीन कौर बनणार एअरफोर्स ऑफिसर
By Admin | Updated: October 3, 2014 23:59 IST2014-10-03T23:59:33+5:302014-10-03T23:59:33+5:30
मॉडेल आणि अभिनेत्री हसलीन कौर तिच्या आगामी चित्रपटात एका एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

हसलीन कौर बनणार एअरफोर्स ऑफिसर
>मॉडेल आणि अभिनेत्री हसलीन कौर तिच्या आगामी चित्रपटात एका एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. फेमिना मिस इंडियाची फस्र्टरनर अप राहिलेल्या हसलीनने यापूर्वी करले ‘प्यार करले’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली आहे. नव्या चित्रपटातील एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेसाठी हसलीन सध्या खूप मेहनत करताना दिसते. या भूमिकेसाठी तिला वजन वाढवावे लागणार असून मसल्सकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. याबाबत ती सांगते की, मी एक बॉस्केटबॉल प्लेअर होते, त्यामुळे हे काम फारसे कठीण वाटत नाही.’ हसलीन नियमित वेट ट्रेनिंग घेत आहे. ही भूमिका चांगल्या प्रकारे अदा करण्यासाठीही ती मेहनत घेत असून विविध वर्कशॉप्स अटेंड करताना दिसते.