'रुस्तम' पाहिल्यानंतर लग्न मोडणार नाहीत - अक्षय कुमार
By Admin | Updated: August 7, 2016 11:16 IST2016-08-07T11:16:00+5:302016-08-07T11:16:00+5:30
आपल्या आगामी 'रुस्तम' चित्रपटाचा विषय पूर्णपणे वेगळा असून महिलांना आवडेल असा हा विषय आहे.

'रुस्तम' पाहिल्यानंतर लग्न मोडणार नाहीत - अक्षय कुमार
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - आपल्या आगामी 'रुस्तम' चित्रपटाचा विषय पूर्णपणे वेगळा असून महिलांना आवडेल असा हा विषय आहे. या चित्रपटामुळे घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल. लोकांची लग्ने मोडणार नाहीत असा विश्वास 'रुस्तम'च्या प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केला.
हा विषय पूर्णपणे वेगळा असून, ख-या आयुष्यात घडलेल्या घटनेवर ही कथा आधारीत आहे. या निमित्ताने प्रथमच पारसी नौदल अधिका-याची व्यक्तीरेखा पडद्यावर साकारणार आहे असे अक्षयने सांगितले. या चित्रपटातून कुठली एक गोष्ट तुला घ्यायला आवडेल या प्रश्नावर अक्षयने हा चित्रपट भरपूर काही देणारा आहे असे उत्तर दिले.
हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांचे घटस्फोट कमी होतील. अनेकांचे वैवाहीक आयुष्य वाचेल असे अक्षयने सांगितले. विवाहबाह्य संबंधांवर या चित्रपटाचे कथानक आधारीत आहे. नौदलात अधिकारी असणा-या अक्षय कुमारला जेव्हा पत्नी आपल्या पाठिमागे फसवणूक करत असल्याचे समजते. तेव्हा तो पत्नीच्या प्रियकराची हत्या करतो.
त्यानंतर कोर्टात खटला उभा रहातो. अक्षयला जनतेची सहानुभूती मिळते. प्रसारमाध्यमांमधून हा विषय भरपूर चर्चिला जातो असे या चित्रपटाचे कथानक आहे. मुंबईत १९५९ साली के.एम.नानावटी या नौदल अधिका-याच्या आयुष्यात घडलेल्या घटनेवर हा चित्रपट आधारीत आहे. नानावटी यांनी त्यांच्या पत्नीच्या प्रियकराची हत्या केली होती.