अनुष्का शर्मानंतर आणखी एक अभिनेत्री चढणार बोहल्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 21:43 IST2018-03-01T21:42:49+5:302018-03-01T21:43:35+5:30
गेल्यावर्षाखेरीस बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मानं भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबत सात फेरे घेत लग्नगाठ बांधली. आता आणखी एक बॉलिवूडची आभिनेत्री लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे.

अनुष्का शर्मानंतर आणखी एक अभिनेत्री चढणार बोहल्यावर
मुंबई - गेल्यावर्षाखेरीस बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मानं भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबत सात फेरे घेत लग्नगाठ बांधली. आता आणखी एक बॉलिवूडची आभिनेत्री लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. दृशम, आवरापन, गलीगली चोर है आणि तुझे मेरी कसम यासारख्या बॉलिवूडच्या चित्रपटात अभिनय करणारी श्रिया सरन या महिन्यात लग्न करणार आहे.
सुरुवातील तामीळ आणि तेलगू चित्रपटात अभिनय करणारी श्रिया सरन रशियन बॉयफ्रेंड एंड्रे कोसचीवसोबत उदयपूरमध्ये लग्न करणार आहे. 17 मार्चपासून लग्नाच्या विधीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 18 तारखेला हळदी, संगीत आणि 19 मार्च रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. हिंदू संस्कृतीप्रमाणे हे लग्न होणार आहे. या लग्नाला फक्त जवळच्या लोकांना बोलवलं आहे. लग्नापूर्वी श्रेया रशियाला गेली होती. तिथे तिने एंड्रे यांच्या परिवाराची भेट घेतली होती.
2001मध्ये श्रेया सरनने अभिनयाला सुरुवात केली होती. रजनीकांत यांच्यासोबतच्या शिवाजी द बॉस या चित्रपटामुळं ती प्रसिद्धीत आली. बॉलिवूड, तामीळ आणि तेलगूमध्ये तिने आपला कसदार अभिनय केला आहे.