तब्बल 9 महिन्यांनतर बिग बींना मिळाला सैराट पाहण्याचा मुहूर्त

By Admin | Updated: January 26, 2017 14:14 IST2017-01-26T13:56:29+5:302017-01-26T14:14:35+5:30

संपूर्ण चित्रपटसृष्टीला झिंगाट गाण्यावर थिरवणा-या 'सैराट'ला अभूतपूर्व यश मिळाले. करण जोहर, आमीर खान यांनादेखील सैराट पाहण्याचा मोह आवरता आला नाही. आता त्यात अमिताभ बच्चन यांचेही नाव जोडले गेले आहे.

After 9 months, Big B's got the opportunity to see Sareata | तब्बल 9 महिन्यांनतर बिग बींना मिळाला सैराट पाहण्याचा मुहूर्त

तब्बल 9 महिन्यांनतर बिग बींना मिळाला सैराट पाहण्याचा मुहूर्त

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. - नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत 'माईलस्टोन' ठरला आहे.  या चित्रपटाच्या कथानकाने आणि त्यातील कलाकारांनीही प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली होती. करण जोहर, आमीर खान यांनादेखील सैराट पाहण्याचा मोह आवरता आला नाही. या यादीत आता सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे नाव जोडले गेले आहे. 

सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल नऊ महिन्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सैराटची स्तुती केली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे सैराटवरील दिलखुलास प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठीतील करिष्मा अर्थात सैराट सिनेमा पाहिला. अफलातून चित्रपट, सिनेकलाकृतीचा विस्मयकारी अनुभव अशा शब्दात अमिताभ यांनी ट्विट केलं आहे.                                                            

सैराट सिनेमातून अल्पावधीतच घराघरांत पोहोचलेल्या आणि तरुणाईला वेड लावणाऱ्या आर्ची आणि परशाला अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरला निवडणूक आयोगाचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नेमले आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदान करा, असे आवाहन ते मतदारांना करणार आहेत.

 

Web Title: After 9 months, Big B's got the opportunity to see Sareata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.