कूल रितेशची जागा घेतली आफताबने
By Admin | Updated: December 5, 2014 23:29 IST2014-12-05T23:29:48+5:302014-12-05T23:29:48+5:30
२ ००५ मध्ये रिलीज झालेल्या ‘क्या कू ल है हम’ या चित्रपटात रितेश देशमुख आणि तुषार कपूर यांनी मुख्य भूमिका निभावली होती.

कूल रितेशची जागा घेतली आफताबने
२ ००५ मध्ये रिलीज झालेल्या ‘क्या कू ल है हम’ या चित्रपटात रितेश देशमुख आणि तुषार कपूर यांनी मुख्य भूमिका निभावली होती. त्यानंतर या चित्रपटाचाच सिक्वल असलेल्या ‘क्या सुपरकूल है हम’मध्येही या दोघांच्या मुख्य भूमिका होत्या; पण चित्रपटाच्या तिसऱ्या भागात ही जोडी फुटणार आहे. क्या कूल है हम-३ या चित्रपटात आता रितेशची जागा आफताब शिवदासानी घेणार आहे. मस्ती आणि ग्रँड मस्तीमधील अभिनयामुळे आफताब क्या कूल है हम या सिरीजमध्ये रितेशची जागा घेऊ शकेल, असा विश्वास चित्रपटाची निर्माती एकता कपूरला वाटला. या चित्रपटासाठी मंडाना करिमी या मॉडेलचीही निवड केली आहे.