आदित्य-सोनाक्षी ‘लिव्ह इन’मध्ये!
By Admin | Updated: July 27, 2015 02:10 IST2015-07-27T02:10:27+5:302015-07-27T02:10:27+5:30
दि ग्दर्शक शाद अली यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर यांची निवड केली आहे. हा चित्रपट मणिरत्नमच्या

आदित्य-सोनाक्षी ‘लिव्ह इन’मध्ये!
दि ग्दर्शक शाद अली यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर यांची निवड केली आहे. हा चित्रपट मणिरत्नमच्या तमिळ चित्रपट ‘ओके कनमानी’चा हिंदी रिमेक आहे, जो २०१५ मधील सर्वांत मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. हा रोमँटिक चित्रपट असून दोन भूमिकांभोवती फिरतो. ज्यांना एकमेकांविषयी प्रेम तर आहे पण, ते लग्न करू इच्छित नाही. दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार करतात जेणेकरून त्यांना त्यांच्या नात्याला लग्नापर्यंत नेण्याची गरज आहे की नाही हे कळेल. तमिळ चित्रपटात दलकूर सलमान आणि नित्या मेनन मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाची कथा, अभिनय आणि ए.आर.रहमान यांच्या संगीताने दर्शकांची मने जिंकली. आता सोनाक्षी आणि आदित्य यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना कि तपत आवडते ? हे पहावे लागेल.