आदिनाथचे गुपित उलगडले...

By Admin | Updated: July 7, 2016 02:52 IST2016-07-07T02:52:27+5:302016-07-07T02:52:27+5:30

मराठी इंडस्ट्रीचा हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिनाथ कोठारेचे गुपित आज उलगडले आहे. आता तुम्ही म्हणाल, आदिनाथने अशी काय गोष्ट एवढे दिवस लपवली होती

Adinath's secret exploded ... | आदिनाथचे गुपित उलगडले...

आदिनाथचे गुपित उलगडले...

मराठी इंडस्ट्रीचा हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिनाथ कोठारेचे गुपित आज उलगडले आहे. आता तुम्ही म्हणाल, आदिनाथने अशी काय गोष्ट एवढे दिवस लपवली होती, की ती आता सर्वांच्याच समोर आली आहे? तर आदिनाथचे हे गुपित अन् सिक्रेट सरप्राइज त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलवणारे आहे. आदिनाथ हा एक चांगला अभिनेता आहे. मस्त डान्स करतो अन् आता तर तो डिरेक्शनमध्येदेखील येत आहे. या सर्व गोष्टी तर तुम्हाला माहीतच आहेत; परंतु याही पलीकडे जाऊन आदिनाथ हा एक उत्तम कवी आहे, हे आतापर्यंत कोणालाच माहीत नव्हते. सीएनएक्सच्या माध्यमातून आपल्या या अभिनेत्याचे हे हाइड सिक्रे ट आज प्रथमच सर्वांसमोर येत आहे. आदिनाथला याबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘‘हो, मी कविता करतो. २०१२पासूनच मी लिहायला लागलो. खरं तर माझाच माझ्यावर विश्वास बसत नाही, कारण माझं शिक्षण संपूर्ण इंग्रजी माध्यमातून झालं आहे. पण, जेव्हा मी अभिनय करायला लागलो तेव्हा मराठी भाषा, साहित्याशी माझा संपर्क वाढला अन् त्याचदरम्यान काही साहित्यिक मित्रांशी गट्टी जमली व मला या सर्व गोष्टींची आवड लावली. पु.ल. देशपांडे, अनिल बर्वे, किशोर कदम हे माझे आवडते लेखक-कवी आहेत. किशोर कदम यांचा तर मी एवढा चाहता आहे, की
त्यांना नेहमी कविता ऐकवायला सांगतो. मला लिहायला फारच आवडते. लिखाणाच्या माध्यमातून स्वत:च्या फीलिंग एक्स्प्रेस करता येतात. आता आदिनाथच्या या अप्रतिम कविता आपल्याला
कोणत्या चित्रपटांच्या गाण्यांमध्ये ऐकायला मिळतात का, याची
तूर्तास तरी आपण प्रतीक्षाच
करू या.

Web Title: Adinath's secret exploded ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.