आदर्श शिंदे गाणार पोवाडा
By Admin | Updated: February 19, 2016 02:00 IST2016-02-19T02:00:18+5:302016-02-19T02:00:18+5:30
पोवाडा म्हटला की, तरुणाईचं रक्त सळसळतं. एक नवीन काम करण्यास प्रेरणा देण्याची उमेद या पोवाड्यामध्ये असते, तसेच सामाजिक कार्य करण्याचा संदेश पोवाड्यामार्फत तळागाळापर्यंत पोहोचवला जातो.

आदर्श शिंदे गाणार पोवाडा
पोवाडा म्हटला की, तरुणाईचं रक्त सळसळतं. एक नवीन काम करण्यास प्रेरणा देण्याची उमेद या पोवाड्यामध्ये असते, तसेच सामाजिक कार्य करण्याचा संदेश पोवाड्यामार्फत तळागाळापर्यंत पोहोचवला जातो. अशाच एका सामाजिक चित्रपटातून मराठी रसिकांना आदर्श शिंदे यांचा पोवाडा ऐकायला मिळणार आहे. जी जी रं जी जी... हा पोवाडा आहे. हा पोवाडा नक्कीच तरुणाईच्या पसंतीस उतरेल. कारण या पूर्वी आदर्श शिंदे यांनी ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’, ‘सुन्या सुन्या’, ‘अंबे कृपा करी’ यांसारखी सुपरहिट गाणी गायली आहेत.