आदर्श शिंदे गाणार गझल
By Admin | Updated: March 21, 2016 01:53 IST2016-03-21T01:53:57+5:302016-03-21T01:53:57+5:30
‘देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, आवाज वाढव डीजे’ यांसारख्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर ठसा उमटविणारे गायक आदर्श शिंदे आता रसिकांसाठी खास गझल घेऊन येत आहेत.

आदर्श शिंदे गाणार गझल
‘देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, आवाज वाढव डीजे’ यांसारख्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर ठसा उमटविणारे गायक आदर्श शिंदे आता रसिकांसाठी खास गझल घेऊन येत आहेत. ‘ऐ सनम आँखो को मेरी खूबसुरत साज दे, येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे’ या गीतासाठी प्रथमच गझल आणि कव्वाली अशा दोन प्रकारांत धून ते वाजविणार आहे. प्रसाद नामजोशी हे ‘रंगा पतंगा’ चित्रपटातून ही गझल प्रेक्षकांपर्यंत पोहोविणार आहेत. आदर्श शिंदे यांना गझल गाण्याची ही संधी कौशल इनामदार यांनी दिली आहे.