​या अभिनेत्रीसोबत सलमान खानचे होणार होते लग्न, पत्रिकाही छापल्या होत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 13:13 IST2017-10-16T07:42:20+5:302017-10-16T13:13:41+5:30

सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न आज सगळ्यांनाच सतावत आहे. सलमानच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत हाच प्रश्न त्याला विचारला ...

The actress was supposed to have Salman Khan's wedding, the magazine was also published | ​या अभिनेत्रीसोबत सलमान खानचे होणार होते लग्न, पत्रिकाही छापल्या होत्या

​या अभिनेत्रीसोबत सलमान खानचे होणार होते लग्न, पत्रिकाही छापल्या होत्या

मान खान लग्न कधी करणार हा प्रश्न आज सगळ्यांनाच सतावत आहे. सलमानच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत हाच प्रश्न त्याला विचारला जातो. कधी तो हसत हसत हा प्रश्न उडवून लावतो तर कधीतरी योग्य वेळ येईल तेव्हा मी लग्न करेन असे सांगतो. पण तुम्हाला माहीत आहे का सलमानचे लग्न अनेक वर्षांपूर्वीच होणार होते. सलमानच्या लग्नाच्या पत्रिकादेखील छापल्या गेल्या होत्या. सलमान एका अभिनेत्रीसोबत अनेक वर्षं नात्यात होता आणि त्याच अभिनेत्रीसोबत त्याचे लग्न होणार होते. पण ऐनवेळी त्याचे लग्न झाले नाही. ही अभिनेत्री कोण आहे हे तुम्हाला कळल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. या अभिनेत्रीने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
ही अभिनेत्री संगीता बिजलानी असून सलमानच्या बिईंग सलमान या पुस्तकात सलमान आणि संगीताच्या लग्नाविषयी उल्लेख करण्यात आला आहे. सलमान आणि संगीता यांनी २७ मे १९९४ ला लग्न करायचे ठरवले होते. त्यांच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या गेल्या होत्या. तसेच लग्नाची जय्यत तयारी देखील सुरू होती. पण संगीताला सलमानच्या काही गोष्टी पटत नसल्याने तिने त्याच्याशी लग्न न करण्याचे ठरवले असे म्हटले जाते. संगीतासोबत अफेअर सुरू असताना सलमानच्या आयुष्यात सोमी अली आली होती आणि हीच गोष्ट संगीताच्या कानावर पडली होती. त्याचमुळे संगीताने सलमानशी लग्न न करण्याचे ठरवले असे म्हटले जाते. सलमानने देखील कॉफी विथ करण या कार्यक्रमात त्याचे संगीतासोबत लग्न होणार होते. पण त्याच्या दुसऱ्या अफेअरबद्दल तिला कळल्यानंतर तिने लग्न मोडले असे कबूल केले होते. 

salman khan and sangeeta bijlani

सलमान आणि संगीता यांचे ब्रेकअप झाल्यानंतरही ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर संगीताने क्रिकेटर मोहोम्मद अझुरुद्दीनशी लग्न केले तर सलमानच्या आयुष्यात ऐश्वर्या राय, कतरिना कैफ अशा अनेक नायिका आल्या. 
संगीता ही सलमानची खूप जवळची मैत्रीण मानली जाते. त्याच्या अनेक घरगुती कार्यक्रमांना ती आवर्जून उपस्थिती लावते. पण गेल्या काही दिवसांपासून ती त्याच्या कोणत्याही कार्यक्रमात दिसत नसल्याने या दोघांमध्ये काही वाद झाले आहेत का हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. 

Also Read : सलमान खानच्या घरी का फिरकेनासी झाली संगीता बिजलानी? ‘खान’ कुटुंबाला का केले अनफॉलो?

Web Title: The actress was supposed to have Salman Khan's wedding, the magazine was also published

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.